शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 4:38 PM

Victor Ambros, Gary Ruvkun, Nobel Prize 2024: मायक्रो-RNA चा शोध लावल्याबद्दल मिळाला बहुमान, मिळणार ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनरची बक्षीस रक्कम

Victor Ambros, Gary Ruvkun, Nobel Prize 2024: अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना मायक्रो RNA वरील संशोधन कार्यासाठी ( discovery of microRNA ) वैद्यकशास्त्रातील ( Physiology or Medicine ) नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. सूक्ष्म RNA वर केलेल्या या संशोधनांमुळे जनुके (Genes) मानवी शरीरात कसे कार्य करतात आणि ते मानवी शरीराच्या विविध गोष्टींना कसे निर्माण करतात हे स्पष्ट करण्यात मदत झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची निवड स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीद्वारे केली जाते. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की त्यांच्या या शोधामुळे जनुके नियमनाचे ( post-transcriptional gene regulation ) एक नवीन तत्त्व समोर आले आहे. हे तत्व मानवासह बहुपेशीय जीवांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

संशोधनात असे दिसून आले की मानवी जीनोम एक हजारांहून अधिक मायक्रो-आरएनएसाठी कोडेड आहे. म्हणजेच मानवी शरीर हे आइडेंटिकल जेनेरिक इन्फॉर्मेशन पद्धतीने म्हणजेच समान प्रकाराने बनलेले असले तरीही प्रत्येक मानवी शरीराच्या पेशींचे आकार आणि कार्य यात बरीच तफावत आहे. चेतापेशींचे इलेक्ट्रिकल इंपल्स हे हृदयाच्या पेशींच्या ठोक्यांपेक्षा वेगळे असतात. तसेच पचनक्रियेची जबाबदारी असलेली यकृत पेशी ही मूत्रपिंडाच्या पेशींपेक्षा वेगळी असते आणि वेगळे कार्य करते. मूत्रपिंडाच्या पेशी या रक्तातून युरिया फिल्टर करतात. तसेच डोळयातील पडद्या मधील पेशींमध्ये पांढऱ्या रक्त पेशींपेक्षा वेगळी प्रकाश-संवेदन क्षमता असते. त्या पेशी संसर्गाशी ( Infection ) लढण्यासाठी मेकॅनिजम तयार करतात.

नोबेल असेंब्लीने म्हटले आहे की शास्त्रज्ञांचे शोध जीवांच्या उत्क्रांतीच्या आणि कार्य करण्याच्या पद्धतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध होत आहेत. अम्ब्रोस यांनी  संशोधन केले. त्यांना हार्वर्ड विद्यापीठात पुरस्कार मिळाला. ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूलमध्ये नॅचरल सायन्सेसचे प्राध्यापक आहेत.

नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सांगितले की, रुवकुन यांचे संशोधन मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रेझेंट करण्यात आले होते. तेथे ते प्राध्यापक आहेत. पर्लमॅन यांनी सांगितले की त्याने त्यांच्या घोषणेच्या काही वेळापूर्वी रुवकुन यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. ते म्हणाले की फोनवर येण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला आणि ते खूप थकलेले वाटले, पण मी बातमी दिल्यानंतर ते उत्साही आणि आनंदी होते.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारscienceविज्ञानHealthआरोग्य