Economics Nobel Prize: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सोमवारी (१४ ऑक्टोबर) घोषणा करण्यात आली. डेरॉन ऐसमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्था आणि प्रगती यासंदर्भात केलेल्या अभ्यासाठी त्यांना नोबेल जाहीर झाले आहे.
नोबेल पुरस्कार समितीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत घोषणा केली आहे. डेरॉन ऐसमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना 'संस्थांची उभारणी कशी होते आणि त्यांचा समृद्धीवर परिणाम' या अभ्यासासाठी नोबेल जाहीर करण्यात आले.
संस्थांची उभारणी आणि परिवर्तन याचा हे समजून घेण्यासाठी पुरस्कार विजेत्या अर्थशास्त्रज्ञांनी तयार केलेले मॉडेल तीन फॅक्टर्सवर आधारित आहे.
तीन अर्थशास्त्राचे तीन स्तरीय मॉडेल काय?
पहिले म्हणजे संसाधनांचे विकेंद्रीकर आणि समाजाची निर्णयशक्ती याच्यातील संघर्ष, दुसरे म्हणजे जनतेला कधी कधीच सत्तेचा वापर करण्याची संधी मिळते आणि ते संघटीत होऊन सत्ताधाऱ्यांना धमकी देऊन असे करायला लावू शकते. त्यामुळे समाजात सत्ता फक्त निर्णय घेण्याच्या अधिकारापेक्षा खूप मोठी आहे. तिसरे म्हणजे कटिबद्ध असण्याची अडचण. ज्याचा अर्थ असा की, अभिजात वर्गाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्याशिवाय जनतेकडे कोणताही पर्याय नाही.