शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

31 वर्षांचा तुरुंगवास, 154 चाबकाचे फटके; कोण आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 5:08 PM

Narges Mohammadi Wins Nobel Peace Prize: इराणमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Narges Mohammadi Wins Nobel Peace Prize:इराणमध्येमहिलांवरील अत्याचाराविरोधात लढणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस यांना महिलांच्या हक्कांसाठी लढल्याने, सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे आतापर्यंत 13 वेळा अटक झाली असून, 31 वर्षे तुरुंगवास आणि 154 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली आहे. सध्या त्या तुरुंगात आहेत.

51 वर्षीय नर्गिस तुरुंगात महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या नर्गिस यांनी व्हाइट टॉर्चर नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांच्या व्यथा पुस्तकात नोंदवल्या. कैद्यांच्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण आणि महिलांचा आवाज उठवणाऱ्या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना 2022 मध्ये रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फाशीची शिक्षा रद्द करण्याची वकिली महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासोबतच नर्गिस फाशीची शिक्षा रद्द करणे आणि कैद्यांच्या हक्कांसाठीही आवाज उठवत आहेत. मानवाधिकारांशी संबंधित या कामांमुळे नर्गिस इराण सरकारच्या डोळ्यात आल्या, परिणामी त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले.

महिलांच्या 33 वर्षांच्या संघर्षाचा प्रवासभौतिकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या नर्गिस यांनी सुरुवातीला अभियंता म्हणून आपले करिअर सुरू केले. त्यानंतर त्यांनी वर्तमानपत्रांसाठी लेखन सुरू केले. हळुहळू त्या महिलांच्या हक्कांसाठी लिहू लागल्या आणि सरकारला प्रश्न विचारू लागल्या. याची सुरुवात 1990 पासून झाली. त्यांना 2011 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पण त्या थांबल्या आणि घाबरल्या नाही.

त्यांना रोखण्यात इराण सरकार अपयशी ठरल्यावर सरकारने नर्गिस यांच्यावर अनेक आरोप केले. सरकारने त्यांच्यावर कैद्यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याचा आरोप केला. यासाठी त्यांना 2011 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. 2 वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांना जामीन मिळाला आणि 2015 मध्ये त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

8 वर्षांपासून मुलांना पाहिले नाहीनर्गिस यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्या 8 वर्षांपासून आपल्या मुलींना भेटलेल्या नाहीत. नर्गिस यांना अली आणि कियाना ही जुळी मुले आहेत. नर्गिस यांची मुलं पती तागी रहमानीसोबत फ्रान्समध्ये राहतात.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारIranइराणWomenमहिलाInternationalआंतरराष्ट्रीय