शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

मोदियानो यांना साहित्याचे नोबेल

By admin | Published: October 10, 2014 5:59 AM

दुस-या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी राजवटीने फ्रान्सवर मिळविलेला कब्जा व त्याचे देशावर झालेले परिणाम याचा आयुष्यभर अभ्यास करणारे फ्रेंच साहित्यिक पॅट्रिक मोदियानो

स्टॉकहोम : दुस-या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी राजवटीने फ्रान्सवर मिळविलेला कब्जा व त्याचे देशावर झालेले परिणाम याचा आयुष्यभर अभ्यास करणारे फ्रेंच साहित्यिक पॅट्रिक मोदियानो याना यावर्षीचे साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.हा पुरस्कार ८० लाख क्रोनरचा (११लाख अमेरिकन डॉलर) इतका आहे. नोबेल पुरस्काराने सन्मानित होणारे मोदियानो हे १५ वे फ्रेंच साहित्यिक आहेतमोदियानो यांची स्मरणशक्ती व त्याच्या सहाय्याने त्यानी दैव वा नशिबाच्या मानवी जीवनावरील प्रभावाची केलेली उकल आणि आक्रमित झालेल्या देशातील जीवनाचे केलेले वर्णन केवळ अभूतपूर्व असून त्यासाठी त्याना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार जाहीर करणाऱ्या स्वीडीश अकादमीने म्हटले आहे. फ्रेंच भाषेत ४५हून अधिक दर्जेदार साहित्यकृती नावावर असलेले मोदियानी फ्रान्समध्ये सर्वश्रृत असले तरी त्यांच्या साहित्याचे इंग्रजीत फारच कमी भाषांतर झाल्याने ते इंग्रजी जाणणाऱ्या विवाला तेवढेचे परिचित नाहीत.मोदियानो (६९) यांच्या मिसिंग पर्सन या कादंबरीला १९७८ चा प्रिक्स गॉनकर्ट हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म १९४७ साली म्हणजेच दुसरे महायुद्ध संपल्यानंतर दोन वर्षानी पॅरिसच्या पश्चिम भागात झाला. त्यांचे वडील इटलीतील ज्यू होते व आई बेल्जियन अभिनेत्री होती. पॅरिस जर्मनीच्या ताब्यात असताना या दोघांचे प्रेम जमले होते. ज्यू नागरिकत्व , नाझी हल्ला व स्वत:ची ओळख नष्ट होणे या तीन मुद्यावर त्यांचे लिखाण बेतलेले असते. त्यात त्यांची १९६८ ची ला प्लेस दी , एटॉईल ही कादंबरीही आहे. जर्मनीच्या होलोकॉस्ट काळातील अत्याचारांच्या या कादंबरीचे जर्मनीतही स्वागत झाले आहे. मोदियानो यांच्या लिखाणाला पहिली ओळख मिळण्यास त्यांच्या आईचे परिचित फ्रेंच लेखक रेमंड क्यूनेऊ यांची मदत झाली असे मोदीयानो मानतात. मोदियानो वयाच्या विशीत असताना रेमंड यांनीच त्याना गलीमार्द पब्लिशिंग हाऊसमध्ये नेले होते. मोदीयानो यांनी फ्रेंच भाषेत ४० पुस्तके लिहीली असून, त्यातील काही इंग्रजीत भाषांतरीत झाली आहेत. रिंग आॅफ रोड (कादंबरी) व्हिला ट्रिस्ते , ए ट्रेस आॅफ मॅलिस , हनीमून ही त्यातील काही पुस्तके . त्यानी लहान मुलांसाठीही साहित्य लिहीले असून, लाकोम्बे ल्युईस या १९७४च्या चित्रपटाची कथाही लिहीली आहे. २००० साली ते कान्न चित्रपट महोत्सवाचे परीक्षक होते. काल, स्मृती व ओळख या तीन थीमवर मोदियानो यांचे साहित्य फिरते असे स्वीडीश अकादमीचे कायम सचिव पीटर इंग्लंड यांनी म्हटले आहे. त्यांची पुस्तके एकमेकाशी बोलतात व ते एकमेकांचे प्रतीध्वनी आहेत असेही त्यानी एसव्हीटी या स्वीडीश वाहिनीशी बोलतना सांगितले. मोदीयानो पॅरिसमध्ये राहतात व क्वचितच मुलाखत देतात. (वृत्तसंस्था)