टोकियो : शांतता आणि अहिंसेशी भारताची बांधिलकी ही भारतीय समाजाच्या रक्तातच रुजलेली असून ती कोणतेही आंतरराष्ट्रीय करार किंवा प्रक्रियांच्या पलीकडील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) भारत स्वाक्षरी करीत नसल्याबद्दल जगात जी चिंता व्यक्त केली जाते त्या पाश्र्वभूमीवर मोदी सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीत विद्याथ्र्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. मोदी म्हणाले,‘‘भारत ही भगवान गौतम बुद्धांची भूमी असून त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य शांततेसाठी ङिाजविले. शांततेसाठी त्यांनी त्रस भोगला आणि त्यांचा तो संदेश भारतभर पसरलेला आहे.’’
भारताकडे अण्वस्त्रे असताना त्याने अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत भारत आपली भूमिका न बदलता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:बद्दल विश्वास कसा वृद्धिंगत करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मोदी यांनी भारताने ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाची अहिंसेशी बांधिलकी राखत कसा लढला व त्याने जग कसे आश्चर्यचकित झाले, याचा दाखला दिला. भारताची अहिंसेशी पूर्ण बांधिलकी असल्याचे मोदी यांनी ठामपणो सांगितले. अण्वस्त्रे प्रसारबंदी करार हा दोषपूर्ण असल्याचे सांगून भारताने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. (वृत्तसंस्था)
चीनवरील मोदींच्या अप्रत्यक्ष टीकेमुळे चीनला राग
च्बीजिंग/टोक्यो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या दौ:यात काही देशांच्या विस्तारवादी प्रवृत्तीच्या केलेल्या उल्लेखामुळे चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमात राग व्यक्त होत आहे. ‘भारतीय नेते (मोदी) हे जास्तच भावनिकदृष्टय़ा जपानच्या जवळ आहेत’ असे भाष्य करण्यात आले आहे.
च्मंगळवारी मोदी यासंदर्भातील प्रश्नापासून दूर राहिले. या उलट जपानच्या वृत्तपत्रने सोमवारी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे व नरेंद्र मोदी यांच्यातील अनिर्णीत राहिलेल्या शिखर परिषदेत चीनचा मोठा अडथळा होता, अशी उघड भावना व्यक्त केली.
च्मोदी यांनी सोमवारी काही राष्ट्रांच्या विस्तारवादी प्रवृत्तीबद्दल केलेल्या टीकेवर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. चीनचा पूर्व चिनी समुद्रातील सेनकाकू बेटांवरून जपानशी बाद सुरू आहे. मोदी म्हणाले होते की, काही विस्तारवादी मनोवृत्तीचे देश इतरांच्या जमिनीवर व समुद्रात अतिक्रमण करतात. चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमाने मंगळवारी चीनविरोधात जपान भारताबरोबर एकजूट करणार असल्यास ती ‘वेडी कल्पना’ ठरेल, अशा शब्दात जपानला इशारा दिला.
सेकड्र हार्ट युनिव्हर्सिटीत विद्याथ्र्याने विचारले होते की, चीनची विस्तारवादी कारस्थाने असताना अशियात शांतता कशी टिकविली जाईल. यावर मोदी विद्याथ्र्याला म्हणाले की, तुला चीनने खूपच त्रस दिलेला दिसतोय. तू पत्रकारांसारखा प्रश्न विचारलाय.
जपानचे दैनिक ‘असाही शिंबून’ने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, भारताचा चीनशी प्रदीर्घ काळापासून सीमावाद आहे त्यामुळे त्याच्याशी वैरभाव न वाढण्यासाठी भारताने जपानबरोबर अणू करार करण्याचे टाळले व मंत्रीपातळीवरील संवाद वाढविण्याचे टाळले.