रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:26 PM2024-10-19T12:26:05+5:302024-10-19T12:30:13+5:30

योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी आधीच रवाना झाले आहे. ही बाब समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली.

North Korea also sent 12,000 soldiers to Russia war; South Korea's intelligence agency claims | रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा

रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा

सेऊल : उत्तर कोरियाने युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी आपले १२,००० सैन्य पाठविले आहे. यामध्ये विशेष मोहिमांसाठीच्या तगड्या सैन्य तुकडीचा समावेश असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी दिली आहे.

योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी आधीच रवाना झाले आहे. ही बाब समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली.

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने केलेल्या निवेदनानुसार, उत्तर कोरियाने सैन्य पाठवणे हा दक्षिण कोरिया आणि जगाच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याची भीती बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या घडामोडींमुळे तणावात आणखी वाढ झाली आहे.

तर महायुद्ध : झेलेन्स्की 
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेनविरुद्ध  लढणाऱ्या रशियन सैन्याला मदत करण्यासाठी १०,००० उत्तर कोरियाचे सैन्य तयार केले जात असल्याची गुप्तचर संस्थांनी माहिती दिली आहे. जर तिसरा देश युद्धात सामील झाला तर संघर्ष “महायुद्धात” बदलू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अशीही मदत... 
नाटोचे महासचिव मार्क रटे म्हणाले की, उत्तर कोरियाचे सैन्य युद्धात सहभागी झाल्याचा आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. मात्र, उत्तर कोरिया रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा, युद्धात पाठिंबा देण्यासाठी तांत्रिक पुरवठा अशा अनेक मार्गांनी मदत करत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.

ओलिसांना साेडणार नाही : हमास
- इस्रायलवर ७ ऑक्टाेबर २०२३ राेजी केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा म्हाेरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचे हमासने मान्य नेले. 

- जाेपर्यंत शस्त्रसंधी हाेत नाही, ताेपर्यंत इस्रायलच्या ओलीस नागरिकांची सुटका करणार नसल्याचे हमासने जाहीर केले आहे. तर, दुसरीकडे इस्रायलने युद्ध सुरूच ठेवण्याचा पावित्रा घेतला आहे. 

पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा : ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व २३ ऑक्टोबर रोजी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी मोदींना या परिषदेसाठी निमंत्रित केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

ब्रिक्स पश्चिमविरोधी नाही : पुतिन : कोणाला विरोध करणे हा ब्रिक्सचा उद्देश नसल्याचा दावा शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी केला. ब्रिक्स हा पश्चिमेत्तर गट असला तरी त्याचा पश्चिम देशांना विरोध नसल्याचे पुतिन म्हणाले. 

चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार : रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार आहेत. त्यादरम्यान ते अनेक नेत्यांशी चर्चा करतील. युद्ध सुरू असताना ही भेट होत असल्याने ही परिषद महत्त्वाची मानली जाते.
 

Web Title: North Korea also sent 12,000 soldiers to Russia war; South Korea's intelligence agency claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.