शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:26 PM

योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी आधीच रवाना झाले आहे. ही बाब समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली.

सेऊल : उत्तर कोरियाने युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी आपले १२,००० सैन्य पाठविले आहे. यामध्ये विशेष मोहिमांसाठीच्या तगड्या सैन्य तुकडीचा समावेश असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी दिली आहे.

योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी आधीच रवाना झाले आहे. ही बाब समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली.

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने केलेल्या निवेदनानुसार, उत्तर कोरियाने सैन्य पाठवणे हा दक्षिण कोरिया आणि जगाच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याची भीती बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या घडामोडींमुळे तणावात आणखी वाढ झाली आहे.

तर महायुद्ध : झेलेन्स्की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेनविरुद्ध  लढणाऱ्या रशियन सैन्याला मदत करण्यासाठी १०,००० उत्तर कोरियाचे सैन्य तयार केले जात असल्याची गुप्तचर संस्थांनी माहिती दिली आहे. जर तिसरा देश युद्धात सामील झाला तर संघर्ष “महायुद्धात” बदलू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अशीही मदत... नाटोचे महासचिव मार्क रटे म्हणाले की, उत्तर कोरियाचे सैन्य युद्धात सहभागी झाल्याचा आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. मात्र, उत्तर कोरिया रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा, युद्धात पाठिंबा देण्यासाठी तांत्रिक पुरवठा अशा अनेक मार्गांनी मदत करत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.

ओलिसांना साेडणार नाही : हमास- इस्रायलवर ७ ऑक्टाेबर २०२३ राेजी केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा म्हाेरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचे हमासने मान्य नेले. 

- जाेपर्यंत शस्त्रसंधी हाेत नाही, ताेपर्यंत इस्रायलच्या ओलीस नागरिकांची सुटका करणार नसल्याचे हमासने जाहीर केले आहे. तर, दुसरीकडे इस्रायलने युद्ध सुरूच ठेवण्याचा पावित्रा घेतला आहे. 

पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा : ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व २३ ऑक्टोबर रोजी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी मोदींना या परिषदेसाठी निमंत्रित केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

ब्रिक्स पश्चिमविरोधी नाही : पुतिन : कोणाला विरोध करणे हा ब्रिक्सचा उद्देश नसल्याचा दावा शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी केला. ब्रिक्स हा पश्चिमेत्तर गट असला तरी त्याचा पश्चिम देशांना विरोध नसल्याचे पुतिन म्हणाले. 

चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार : रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार आहेत. त्यादरम्यान ते अनेक नेत्यांशी चर्चा करतील. युद्ध सुरू असताना ही भेट होत असल्याने ही परिषद महत्त्वाची मानली जाते. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध