प्योंगयांग - उत्तर कोरियाचे सनकी हुकूमशहा किम जोंग-उन यांनी भांडवलशाहीच्या पतनाचे प्रतीक म्हणून पाळीव कुत्र्यांना पकडण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे, या कुत्र्यांच्या मालकांना भीती आहे की या पाळीव प्राण्याचा वापर देशात चालू असलेल्या खाद्य संकटावर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो. जुलै महिन्याच्या सुरूवातीस किम जोंग-उनने पाळीव कुत्रे पाळणे कायद्याच्या विरोधात असल्याचं घोषित केले.
उत्तर कोरियाच्या चोसन इल्बो या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, किम जोंग म्हणाले की कुत्री घरीच ठेवणे भांडवलशाही विचारसरणीचा कल मानला जाईल. त्यानंतर उत्तर कोरियाच्या प्रशासनाने पाळीव कुत्री ठेवलेल्या घरांची यादी बनवली आहे. प्रशासन पाळीव कुत्र्यांना सोडून देण्यासाठी जबरदस्तीने आणि जप्तीची कारवाई करत आहे.
उत्तर कोरियनच्या प्रायद्वीपवर कुत्र्यांचे मांस आवडीने खातात
काही कुत्री सरकारी प्राणीसंग्रहालयात पाठविली गेली आहेत तर काहींना मांसाच्या दुकानात विकण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया अन्नाचा तुटवडा आहे. ५५ लाख लोकसंख्या असलेल्या उत्तर कोरियाच्या ६० टक्के लोक अन्नाच्या संकटाचा सामना करत आहेत. येणाऱ्या काळात हे अधिक गंभीर होणार आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रम सुरू ठेवण्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.
उत्तर कोरियन प्रायद्वीपमध्ये कुत्र्याचे मांस खूपच पसंत केले जाते. दक्षिण कोरियामध्ये, कुत्री खाण्याची प्रथा हळूहळू संपत आहे. दक्षिण कोरियामध्ये दरवर्षी सुमारे दहा लाख कुत्रे खाल्ल्या जातात. दुसरीकडे, माणसाचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जाणारा कुत्रा अजूनही उत्तर कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात खाण्यात येतात. राजधानी प्योंगयांगमध्ये कुत्र्याच्या मांसासाठी अनेक रेस्टॉरंट्स आहे.
किम यांनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांना दोन कुत्रे दिले होते
उत्तर कोरियामध्ये, गरम आणि दमट हवामानात कुत्र्याचे मांस खाणे पसंत केले जाते. कुत्र्याचे मांस खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला ऊर्जा आणि स्टॅमिना मिळतो. उत्तर कोरियातील मोठी माणसं सकाळी कुत्र्यांसोबत फिरताना दिसतात. ऑक्टोबर २०१८ मध्ये किम जोंग उन यांनी स्वत: दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांना दोन पुंगसन कुत्रे भेट म्हणून दिले होते.