सिंगापूर : सिंगापूरमध्ये साऱ्या जगाचं लक्ष लागलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. ज्यात आण्विक शस्त्र नष्ट करण्याचाही करार आहे.
उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांचं जगणं नेहमीच एक रहस्य राहिलं आहे. त्यांची जन्मतिथीही लोकांना माहीत नाहीये. किम जोंग उन यांची जीवनशैली ही इतर देशांच्या प्रमुखांपेक्षा फारच वेगळी आहे. त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या हेअरस्टाइलपर्यंत सर्वच नॉर्थ कोरियासह जगभरात प्रसिद्ध आहे.
किम यांची हेअरस्टाइल नेहमीच चर्चेत असते. त्यांची ही हेअरस्टाइल नॉर्थ कोरियातील मोठ्यांसह लहानांनाही आकर्षित करते. जास्तीत जास्त लोक हे किम यांची हेअरस्टाइल फॉलो करतात. खरंतर त्यांची हेअरस्टाइल फॉलो करणे नॉर्थ कोरियातील लोकांसाठी आता प्रथाच झाली आहे.
लहानपणी किम जोंग उन यांची हेअरस्टाइल फारच साधारण असायची. पण एक लिडर म्हणून नावारुपाला येत असताना त्यांनी आपल्या हेअरस्टाइलमध्ये बदल केला. 2010 मध्ये साउथ कोरियाच्या एका वेबसाईटने त्यांच्या बदलत्या लूक्सची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांचे केस फार विस्कटलेले होते. पण नंतर त्यांनी आपली हेअरस्टाइल बदलली.
रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उन यांची सध्याची हेअरस्टाइल ही नॉर्थ कोरियाचे फाऊंडर आणि त्यांचे आजोबा यांच्याकडून प्रेरित आहे.
नॉर्थ कोरियातील 'Inmin Kyoyook' या एज्युकेशनल मॅगझिनने तेथील पुरुष अध्यापकांना किम यांची paeki हेअरस्टाइल ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरुन तेथील तरुणांमध्येही ही हेअरस्टाइल प्रचलित होईल.
2015 मध्ये किम जोंग उन यांनी नॉर्थ कोरियासाठी काही निवडक म्हणजेच 28 हेअरस्टाइल ठरवून दिल्या होत्या. तेथील पुरुषांना लांब केस ठेवण्याची परवानगी नाहीये. सर्वच पुरुषांना किंम जोंग यांच्यासारखीच हेअरस्टाइल ठेवण्याचा सल्ला दिला जातो.