उत्तर कोरियाने आपल्या देशातील लोकांसाठी नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कोणतीही मुले हॉलिवूड चित्रपट किंवा टीव्ही कार्यक्रम पाहताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरुंगात टाकले जाईल. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचा हा आदेश केवळ हॉलिवूडसाठीच नाही तर दक्षिण कोरियाच्या चित्रपटांसाठीही जारी करण्यात आला आहे.
आदेशानुसार, कोणतीही मुले हॉलिवूड किंवा दक्षिण कोरियन चित्रपट पाहताना पकडली, तर त्यांच्या पालकांना 6 महिन्यांसाठी सक्तीच्या मजुरी शिबिरात पाठवले जाणार आहे. कारण, मुलांना पाच वर्षांपर्यंत अशी शिक्षा भोगावी लागेल, ज्याचा ते विचारही करू शकणार नाहीत. यापूर्वी 'गुन्हा' साठी दोषी आढळलेले पालक कठोर चेतावणी देऊन सुटू शकत होते. पण, आता असे काहीही होणार नाही.
मिररमधील वृत्तानुसार, हर्मिट किंगडममधील सूत्रांचे म्हणणे आहे की, प्योंगयांगने 'इनमिनबान' सुरू केले आहे. ही एक अनिवार्य परिसर निरीक्षण बैठक आहे, ज्यामध्ये शासनाचे आदेश समुदायांपर्यंत पोहोचतात. रेडिओ फ्री एशियाने सांगितले की, जे हे चित्रपट पाहताना आढळतील त्यांच्या पालकांना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. किम जोंग उन यांच्या समाजवादी आदर्शांच्या अनुषंगाने आपल्या मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यात अयशस्वी होण्याबद्दल देखील चेतावणी देईल.
दरम्यान, या आदेशाद्वारे केवळ चित्रपटप्रेमींनाच लक्ष्य केले जात नाही, तर ज्यांना गाणे, नृत्य आणि बोलणे आवडते अशा लोकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. जर कोणी दक्षिण कोरियाप्रमाणे परफॉर्म करताना आढळला तर त्याला आणि त्याच्या पालकांनाही 6 महिन्यांची शिक्षा होईल. दुसरीकडे, जे पालक आपल्या मुलांना हॉलीवूडचे ब्लॉकबस्टर चित्रपट पाहू देतात त्यांना तुरुंगात टाकले जाईल.