न्यू यॉर्क - अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये अणुयुद्ध होण्याच्या भीतीला पुन्हा एकदा बळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ''प्रशांत महासागरात प्योंगयांगकडून देण्यात आलेल्या सर्वाधिक शक्तिशाली अणुचाचणीच्या धमकीला वॉशिंग्टननं गांभीर्यानं घेतलं पाहिजे'', असे यावेळी उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिका-यानं सांगत अमेरिकेला पुन्हा एकदा धमकीवजा इशारा दिला आहे. गेल्या महिन्यात उत्तर कोरियानं आपल्या सर्वात जास्त शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती, यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्योंगयांगला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची धमकीदेखील दिली होती. यावर, ''उत्तर कोरिया प्रशांत महासागरात शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी करू शकतो'', असे प्रत्युत्तर उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांनी दिले होते.
उत्तर कोरियाचे वरिष्ठ राजदूत रि यॉन्ग पिल यांनी 'सीएनएन'सोबत संवाद साधताना म्हटले की, उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीला अमेरिकेनं गांभीर्यानं घेतले पाहिजे. पिल यांनी पुढेही असेही म्हटले की, ''उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री यांना किम जोंग-ऊन यांच्या हेतूची पूर्णतः जाणीव आहे, यामुळे अमेरिकेनं याकडे गांभीर्यानं पाहावं''.
दरम्यान, उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी न्यू-यॉर्क येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सांगितले होते की, उत्तर कोरिया प्रशांत महासागरात शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी करू शकतो. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी प्योंगयांगवर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लावले होते. अशातच, उत्तर कोरियाकडून वारंवार मिळणा-या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर शेजारील देश हाय अलर्टवर आहेत.
कोणत्याही क्षणी होईल अणुयुद्धाला सुरूवात, उत्तर कोरियाची पुन्हा धमकीदरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त सैन्य सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनचा पारा चढलाय. त्यामुळे येथील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, अणुयुद्धाला कोणत्याही क्षणी सुरूवात होऊ शकते, असा इशारा उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वी दिला होता. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त सैन्य सरावामुळे उत्तर कोरियाचा चांगलाच संताप झालाय. त्यांनी अमेरिकेचं कॅरिबियाई क्षेत्र गुआम येथे मिसाइल हल्ला करण्याची पुन्हा धमकी दिली आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, आमचा देश संपूर्णपणे अणू संपन्न झालाय आणि अमेरिकेचा संपूर्ण मुख्य भूभाग आमच्या फायरिंग रेंजमध्ये आहे, अशी प्रकारचा इशारा संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे उप-उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी दिला होता.
उत्तर कोरिया एक जबाबदार अणू देश असल्याचं प्रमाणपत्रंही त्यांनी देऊन टाकलं. याशिवाय उत्तर कोरियाविरोधात अमेरिकी सैन्यासोबत कोणत्याही देशाने सराव करू नये अशी धमकीही त्यांनी दिली. इतर कोणत्या देशाविरोधात अणू हल्ला करण्याचा अथवा धमकी देण्याचा आमचा प्रयत्न नसल्याचंही ते म्हणाले.
उत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही- चीनअमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील धमक्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली आहे. जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं होतं.