सोल : उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या विरुद्ध अंदाधुंद अणुहल्ले करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या देशांमधील तणाव आता आणखी वाढला आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्य अभ्यासाविरुद्धचा हा इशारा आहे. सैन्याभ्यासाच्या निमित्ताने कोरिया बेटावरील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अर्थात यावर्षीचा तणाव अधिक आहे. कारण गेल्या महिनाभरात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बसह क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. याविरोधात संयुक्त राष्ट्र संघाने उत्तर कोरियाविरुद्ध कडक निर्बंध लावले आहेत, तर या निर्बंधामुळे उत्तर कोरिया नाराज आहे. संयुक्त अभ्यासात तीन लाख दक्षिण कोरियाई आणि १७ हजार अमेरिकी सैनिक सहभागी होत आहेत.(वृत्तसंस्था)