सोल (दक्षिण कोरिया) : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग-उन हे कोमामध्ये गेल्याचा दावा दक्षिण कोरियाचे दिवंगत अध्यक्ष किम डाए-जुंग यांचे माजी सहायक चँग सोंग-मिन यांनी केला आहे.
किम यांनी त्यांची बहीण किम यो जोंग हिच्याकडे अधिकार सोपवल्यानंतर चँग सोंग-मिन यांनी हा दावा केला. वारसा कोणाकडे जाईल याची पूर्ण रचना तयार केलेली नाही. त्यामुळे किम यो-जोंग हिला समोर आणण्यात आले. बहिणीकडे आणखी सत्ता सोपवण्याचा किम यांचा निर्णय हा देशाच्या सत्तेत त्यांची बहीण दुसऱ्या पायरीवर असल्याच्या युक्तिवादाला बळच देत आहे.अधिकार काय?बहिणीकडे दिलेल्या काही अधिकारांत तिने ‘देशाचे सामान्य कामकाज’ बघायचे आहेत. त्यामुळे किम जोंग-उन यांच्यावरील कामाचे काही ओझे हलके होईल, असे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचे आकलन आहे. ‘‘किम जोंग-उन हे कोमामध्ये गेल्याचे माझे मत आहे; परंतु त्यांचे जीवन संंपलेले नाही,’’ असे चँग सोंग-मिन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.