प्योंगयांग :उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ठणठणीत असून पूर्णपणे सुखरूप आहेत. जगभरातील माध्यमांमध्ये गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या मृत्यूच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, यातच त्यांनी शुक्रवारी प्योंगयांगजवळ एका खताच्या कारखान्याचे उद्घाटन केले. जवळपास तीन आठवड्यांनंतर पहिल्यांदाच ते सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. किम जोंग यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओदेखील आता समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये किम जोंग पूर्णपणे ठणठणीत दिसत आहेत. त्यांनी स्वतःच संपूर्ण फॅक्ट्रीची पाहणी केली आणि उद्घाटन समारंभातही भाग घेतला. यावेळी येथे उपस्थित अलेल्या हजारो लोकांनी हात हलवून त्यांचे स्वागत केले. एवढेच नाही, तर किम जोंग यांनीही त्यांच्यात जाऊन त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. याचबरोबर ते आजारी असल्याच्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे.
काळे कपडे घातलेले किम जोंग हसताना दिसले -उत्तर कोरियातील अधिकृत वृत्त संस्था ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सी’ने दिलेल्या माहितीनुसार, किम हे आपल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सुनचोन येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी त्यांची बहीण किम यो जोंगदेखील उपस्थित होती.
विश्लेषकांच्या मते, किम जोंग उन यांच्यानंतर त्यांची बहीणच देशाचा गाडा चालवेल. सरकारी वृत्तपत्र ‘रोडोंग सिनमून’ने किम यांचे बरेच फोटो प्रकाशित केले. यात त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून हसताना दिसत आहेत. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. तर किम यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती उत्तर कोरिया प्रशासनाकडून देण्यात येत होती.
CoronaVirus News : आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी