उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हा त्याच्या क्रूरतेसाठी लोकप्रिय आहे. त्याचा क्रूर चेहरा हा सातत्याने जगासमोर येत असतो. त्याच्या अजब कायद्यांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हुकूमशाह किम जोंग उनचं वजन घटलं असून तो बारीक झाला आहे. तब्बल 20 किलो वजन कमी झाल्याने उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा नवा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांना अश्रू अनावर झाले आहेत. 37 वर्षीय किमचं वजन वेगाने घटल्याने त्याच्या प्रकृतीविषयी चर्चा सुरू झाली आहे.
एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्योंगयांगमधील नागरिक एक कार्यक्रम मोठ्या स्क्रिनवर बघताना दिसत आहे. या कार्यक्रमात किम जोंग उन आला होता. तेव्हा त्याची स्थिती बघून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसेच किम जोंगच्या तब्येतीविषयी अनेक तर्क देखील लावले जात आहेत. "देशात प्रत्येक जण आपल्या नेत्याचं वजन कमी झाल्याने चिंतेत आहेत. आम्हाला त्यांचं असं स्वरुप पाहून दु:ख झालं आहे. त्यामुळे आम्हाला अश्रू रोखणं कठीण झालं आहे" असं उत्तर कोरियातील एका व्यक्तीने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हुकूमशाह किम जोंग उनचं वजन कमी होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच याबाबच कोणतीही अधिकृत माहितीही समोर आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काही दिवसांपूर्वी किम जोंग उन याने आता के-पॉप प्रेमींना जाहीर धमकी दिली आहे. प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पॉप गाणी ऐकणाऱ्यांना थेट 15 वर्षे श्रमिक शिबिरात (लेबर कॅम्प) काम करावे लागणार आहे. के-पॉप संगीत एखाद्या कॅन्सरसारखं असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियात कोरियन पॉप गाण्यांना के-पॉप म्हटलं जातं. मुख्यत: पाश्चिमात्य संगीतावर आधारीत असलेल्या के-पॉपमध्ये नृत्य आणि संगीतात नवीन ट्रेंड रुजत आहेत. त्यामुळे के-पॉपची लोकप्रियता जगभरात वाढत आहे.
हुकूमशहा किम जोंगची पुन्हा सटकली! 'ही' गाणी ऐकल्यास 15 वर्षे लेबर कॅम्पमध्ये करणार कैद अन्...
दक्षिण कोरियाचे टीव्ही शो, चित्रपटांनाही लोकप्रियता लाभत आहे. उत्तर कोरियामध्येही याची लोकप्रियता वाढत आहे. दक्षिण कोरियाच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेता उत्तर कोरिया सरकार सतर्क झाले आहे. उत्तर कोरियामध्ये मनोरंजनाची साधने ही मर्यादित स्वरुपात आहेत. माध्यमे आणि इंटरनेटवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. त्यामुळेच अनेकजण दक्षिण कोरियातून बेकायदेशीरपणे मनोरंजनासाठी तेथील संगीत, चित्रपटांच्या सीडी, डीव्हीडी मागवतात. सीमेवर तपासणी कठोर केल्यानंतर तस्करीचा मार्गही बदलण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी नुकतीच या प्रकारावर कठोर टीका केली आहे. दक्षिण कोरियाई चित्रपट, नाटक आणि के-पॉप संगीताच्या माध्यमातून उत्तर कोरियातील समाजवादाविरोधात आणि सरकारविरोधात लोकांना चिथावणी देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच आता किम जोंग उन यांच्या सरकारने सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी नवीन आदेश जारी केले आहेत.