उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. किम जोंग उन उत्तर कोरियाचे हुकूमशाह असून त्यांच्या क्रूरतेचा अंदाज अनेकवेळा समोर आला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का किम जोंग उन यांनी स्वत:च्या काकालाच विचित्र स्वरुपाची शिक्षा दिली होती.
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन हे आपल्या विचित्र स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. समाजमाध्यमावरील किमचे शेकडो किस्से आपणास माहिती असतील. मात्र स्वतःच्या काकाचा काटा काढण्यासाठी किम जोंग उन यांनी केलेला विचित्र प्रकार ऐकलात तर आपला कानांवर विश्वासही बसणार नाही.
उत्तर कोरियातील दुसरे सर्वात प्रभावी राजकीय नेते म्हणून जैंग सोंग थाएक ( किमचे काका) यांची ओळख होती. थाएक यांनी किम जोंग उन यांच्याऐवजी आपला सावत्र भाऊ किम जोंग नाम यांना देशाचा नेता बनवायचा होता. यासाठी थाएक यांनी बीजिंगमध्ये तत्कालीन चिनी अध्यक्ष हू जिंताओंची भेट घेतली होती. मात्र हा सर्व प्रकार किम जोंग उनच्या लक्षात आला. यानंतर किम जोंग उनने आपल्या काकाला राष्ट्रद्रोह व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 12 डिसेंबर रोजी विचित्र पद्धतीची शिक्षा दिली होती.
किम जोंग उनने १२० शिकारी कुत्रे बंद करण्यात आलेल्या पिंजऱ्यात जैंग सोंग थाएक यांना सोडले. विशेष म्हणजे या शिक्षेसाठी कुत्र्यांना चक्क 3 दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. जैंग थाएक यांच्या सहा साथीदारांनाही अशाच प्रकारची क्रूर शिक्षा देण्यात आली. या सर्व कारवाईसाठी स्वतः किम जोंग उन देखील उपस्थित होते.
कुत्र्यांना उपाशी ठेऊन माणसांना मृत्यू देण्याच्या शिक्षेला स्थानिक भाषेत 'क्वैन जे' अस म्हटलं जातं. किम जोंग उन यांनी याआधीही अशाच प्रकारच्या क्रूर हत्या घडवून आणल्या आहेत. किम जोंग उन यांची पूर्व प्रेमिका आणि प्रसिद्ध गायिका ‘ह्योन सोंग-वोल’ ला गोळ्या घालण्याची विचित्र शिक्षाही किम जोंग उन यांनी सुनावली होती.
इतर महत्वाच्या बातम्या-
...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ
Coronavirus: लोक कोरोनाशी लढताहेत; पण सरकार कुठे आहे?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल