सिंगापूर - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे नेते किम ज्याँग ऊन यांच्यात मंगळवारी झालेली शिखर बैठक अपेक्षेहून फलदायी झाल्याचा दावा अमेरिकेने केला. उत्तर कोरियाने अण्वस्त्रविकास कार्यक्रम मोडीत काढून कोरियन उपखंड अण्वस्त्रमुक्त करण्याचे वचन दिले, तर अमेरिकेने उत्तर कोरियाला सुरक्षेची हमी देताना दक्षिण कोरियासह होणारे प्रक्षोभक’ लष्करी सराव थांबविण्याचे जाहीर केले.परस्परांना पाण्यात पाहणाऱ्या व अण्वस्त्रे डागून बेचिराख करण्याची धमकी देणाºया दोन्ही देशांचे नेते ७० वर्षांत प्रथमच भेटले. सिंगापूरच्या सेन्टोसा बेटावर ही ऐतिहासिक व बहुप्रतिक्षित भेट झाली. भेटीनंतर त्रोटक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात दोन्ही देशांनी शाश्वत शांततेसाठी नेटाने पावले टाकण्याची प्रतिबद्धता जाहीर केली. जागतिक शांततेस मोठा धोका ठरू शकणारा तणाव व संघर्ष मिटविण्याच्या या कराराचे भारतासह अनेक देशंनी स्वागत केले.भेटीनंतर ट्रम्प प्रफु्ल्लित असल्याचे जाणवले. त्यांनी सुमारे तासभर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. उत्तर कोरिया दिलेले आश्वासन पाळते की नाही याची अमेरिका पुरेपूर खात्री करेल व तोपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे ट्रम्प म्हणाले. बैठकीतील निर्णय प्रत्यक्षात आणण्याचा तपशील दोन्ही देशांची शिष्टमंडळे चर्चा करून ठरवतील, असे ते म्हणाले.या ऐतिहासिक भेटीबद्दल किम यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. बैठक आटोपून किम लगेचच मायदेशी रवाना झाले. ट्रम्प आणखी एक दिवस थांबणार होते, पण बेत बदलून तेहीर् े अमेरिकेस परतले. (वृत्तसंस्था)माझी चूक होतीखरे तर ही भेट पाच वर्षांपूर्वीच व्हायला हवी होती. याआधी धमकीच्या भाषेत बोलणे ही माझी चूक होती, असे वाटते. पण तसे केले नसते तर ही भेटही शक्य झाली नसती.- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिकाआम्ही सर्वांवर मात केलीयेथे येणे सोपे नव्हते. भूतकाळने जखडले होते व पूर्वग्रह आणि गतकृत्यांचे अडथळे होते. या सर्वांवर मात करून आम्ही येथे आलो. -किम ज्याँग उन,राष्ट्राध्यक्ष, उत्तर कोरिया
उत्तर कोरियाने दिली अण्वस्त्रत्यागाची ग्वाही, ट्रम्प-किम भेटीनंतर अमेरिकेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 6:36 AM