उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन जगात कुठेही जाताना सोबत टॉयलेट घेऊन जातो. किम जगभतील कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर जात असताना स्वत:चं टॉयलेट सोबत नेतो. उत्तर कोरियाच्या गार्ड कमांडमधील माजी कर्मचाऱ्यानं यामागचं कारण सांगितलं आहे. आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती कोणालाही मिळू नये यासाठी किम कुठेही जात असताना टॉयलेट घेऊन जातो.
दुसऱ्या टॉयलेटचा वापर केल्यास स्वत:च्या प्रकृतीबद्दलची माहिती लीक होईल अशी भीती किमला वाटते. किम परदेशी जाताना सोबत पोर्टेबल टॉयलेट ठेवतो. एखाद्या व्यक्तीच्या विष्ठेच्या माध्यमातून त्याच्या आरोग्याशी संबंधित बरीच माहिती मिळवता येऊ शकते. दुसऱ्या देशात असलेल्या टॉयलेटचा वापर केल्यास प्रकृतीसंबंधीची माहिती लीक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे किम परदेशात जाताना स्वत:चं टॉयलेट सोबत नेतो.
किम जोंग उन वापरत असलेल्या सगळ्या वाहनांना त्याच्या गरजेनुसार डिझाईन करण्यात आलं आहे. मात्र सध्या तो केवळ हायटेक कारमधूनच प्रवास करतो. किमकडे बुलेटप्रूफ मर्सिडिज बेंझ आहे. या कारची रचना टॉयलेट वापरता येईल अशी करण्यात आली आहे. विष्ठेच्या माध्यमातून शत्रू आपल्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती गोळा करेल, अशी भीती किमला वाटते.