जगात रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia Ukraine War) तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे का? माजी फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus) यांच्या भाकितानुसार पुढील वर्षी जगात तिसरे महायुद्ध पेटण्याची शक्यता आहे. (Nostradamus Prediction)
नॉस्ट्रॅडॅमसने केलीय अशी भविष्यवाणी - द सनने दिलेल्या वृत्तानुसार, नॉस्ट्राडेमस हे एक फ्रान्च ज्योतिषी होते. त्यांचा जन्म 16व्या शतकात झाला होता. त्यावेळी त्यांनी भविष्यातील अनेक जागतिक घडामोडींसंदर्भात भाकीतं केली. एवढेच नाही, तर रशिया-युक्रेन युद्ध हे त्यांच्या याच भाकितांपैकी एक असल्याचेही मानले जात आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल. पण विविध देशांतील मतभेदांची ठिणगी आतल्या आतच धगधगत राहतील. यामुळे पुढील वर्षात पूर्व युरोपमध्ये मोठे युद्ध सुरू होईल. हे स्पष्टपणे तिसरे महायुद्ध असेल, असेही नॉस्ट्रॅडॅमसने म्हटले होते, असे मानले जाते.
7 महिने चालणार तिसरे महायुद्ध -नॉस्ट्राडेमसने असेही म्हटले आहे की, तिसरे महायुद्ध सुमारे 7 महिने चालेल आणि या दरम्यान जगभरात लाखो लोक मारले जातील. या युद्धात जग भरात मोठ्या प्रमाणावर आगीचा पाऊस पडेल. अनेक देशांचे अस्तित्व संपुष्टात येईल आणि यातून वाचलेले लोक नव्याने मानवी जीवनाची सुरुवात करतील. यामुळे जगात एक नवी जागतिक वस्था सुरू होईल.