Nostradamus Predictions Of War In 2022: नॉस्ट्रॅडॅमसची युद्धाची भविष्यवाणी खरी ठरली; सोने, चांदी, अणुबॉम्ब हल्ला, काय काय आहे वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:26 PM2022-02-24T14:26:25+5:302022-02-24T14:28:10+5:30
Russia- Ukraine War Started, Nostradamus Predictions: नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जग विश्वास ठेवते. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली आहेत. आजही रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण युरोपवर युद्धात होरपळण्याचे ढग दाटू लागले आहेत.
फ्रान्सचे जगविख्यात ज्योतिषी माइकल दि नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus Predictions) यांनी कित्येक वर्षांपूर्वी आजच्या रशिया-युक्रेन युद्धाची भविष्यवाणी केली होती. नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जग विश्वास ठेवते. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली आहेत. आजही रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण युरोपवर युद्धात होरपळण्याचे ढग दाटू लागले आहेत. नॉस्ट्रॅडॅमसने सोने, चांदी आणि अणुबॉम्ब हल्ल्यावरही मोठी भविष्यवाणी केली आहे. जाणून घ्या २०२२ मध्ये काय काय वाढून ठेवले आहे.
नॉस्ट्रॅडॅमसने 2022 साठी ज्या भविष्यवाण्या केल्या आहेत त्या जगासाठी चिंतेचा विषय ठरू लागल्या आहेत. या भविष्यवेत्त्याने युरोप युद्धात लोटला जाणार असल्याचे भाकित केले होते. अनेक देश या युद्धामध्ये उतरणार आहेत. अणुयुद्धाची भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे. परंतू याच अण्वस्त्रांमुळे पृथ्वीवरील वातावरणात मोठे बदल होतील तसेच पृथ्वीच्या स्थितीतही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली आहे.
घणघोर युद्धात अवघे जग ७२ तास अंधारात लोटले जाईल असे नॉस्ट्रॅडॅमस यांनी म्हटले आहे. शरद ऋतूतील पर्वतांवर बर्फवृष्टी होऊ शकते. एका नैसर्गिक घटनेमुळे अनेक देशांमधील युद्ध संपुष्टात येईल. तीन दिवस जग अंधारात असेल आणि त्यानंतर आधुनिक जीवन संपेल. 2022 मध्ये विनाशानंतर शांतता नांदेल, असे नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे.
युरोपवर मोठे संकट....
२०२२ च्या सुरुवातीलाच युरोपवर युद्धाचे मोठे संकट कोसळेल. यामुळे मोठमोठी वादळे निर्माण होतील. जगातील अनेक भागात भीषण आग, दुष्काळ आणि पूर अशी परिस्थिती निर्माण होईल. मोठ्या प्रमाणावर भूकबळीची समस्या जाणवेल, अशी भविष्यवाणी या जगविख्यात भविष्यवेत्त्याने केली होती.
अमेरिकेसाठी धोका....
नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये महागाई बेलगाम होणार आहे. वेगाने अमेरिकी डॉलर कोसळणार आहे. 2022 मध्ये लोक सोने. चांदी आणि बिटक़ॉईनलाच संपत्ती समजू लागणार आहेत. यामध्ये लोक जास्त पैसा गुंतवू लागतील आणि हेच कारण पृथ्वीला उद्ध्वस्त करणार आहे. आज अमेरिकेच महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. युद्धामुळे आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.