शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

Nostradamus Predictions Of War In 2022: नॉस्ट्रॅडॅमसची युद्धाची भविष्यवाणी खरी ठरली; सोने, चांदी, अणुबॉम्ब हल्ला, काय काय आहे वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 2:26 PM

Russia- Ukraine War Started, Nostradamus Predictions: नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जग विश्वास ठेवते. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली आहेत. आजही रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण युरोपवर युद्धात होरपळण्याचे ढग दाटू लागले आहेत.

फ्रान्सचे जगविख्यात ज्योतिषी माइकल दि नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus Predictions) यांनी कित्येक वर्षांपूर्वी आजच्या रशिया-युक्रेन युद्धाची भविष्यवाणी केली होती. नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जग विश्वास ठेवते. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली आहेत. आजही रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण युरोपवर युद्धात होरपळण्याचे ढग दाटू लागले आहेत. नॉस्ट्रॅडॅमसने सोने, चांदी आणि अणुबॉम्ब हल्ल्यावरही मोठी भविष्यवाणी केली आहे. जाणून घ्या २०२२ मध्ये काय काय वाढून ठेवले आहे. 

नॉस्ट्रॅडॅमसने 2022 साठी ज्या भविष्यवाण्या केल्या आहेत त्या जगासाठी चिंतेचा विषय ठरू लागल्या आहेत. या भविष्यवेत्त्याने युरोप युद्धात लोटला जाणार असल्याचे भाकित केले होते. अनेक देश या युद्धामध्ये उतरणार आहेत. अणुयुद्धाची भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे. परंतू याच अण्वस्त्रांमुळे पृथ्वीवरील वातावरणात मोठे बदल होतील तसेच पृथ्वीच्या स्थितीतही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली आहे. 

घणघोर युद्धात अवघे जग ७२ तास अंधारात लोटले जाईल असे नॉस्ट्रॅडॅमस यांनी म्हटले आहे. शरद ऋतूतील पर्वतांवर बर्फवृष्टी होऊ शकते. एका नैसर्गिक घटनेमुळे अनेक देशांमधील युद्ध संपुष्टात येईल. तीन दिवस जग अंधारात असेल आणि त्यानंतर आधुनिक जीवन संपेल. 2022 मध्ये विनाशानंतर शांतता नांदेल, असे नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे. 

Nostradamus Predictions 2022: पृथ्वी घोर संकटात! महागाई, बिटक़ॉईन, विनाशावर नॉस्ट्रॅडॅमसची भयानक भविष्यवाणी

युरोपवर मोठे संकट....२०२२ च्या सुरुवातीलाच युरोपवर युद्धाचे मोठे संकट कोसळेल. यामुळे मोठमोठी वादळे निर्माण होतील. जगातील अनेक भागात भीषण आग, दुष्काळ आणि पूर अशी परिस्थिती निर्माण होईल. मोठ्या प्रमाणावर भूकबळीची समस्या जाणवेल, अशी भविष्यवाणी या जगविख्यात भविष्यवेत्त्याने केली होती. 

अमेरिकेसाठी धोका....नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये महागाई बेलगाम होणार आहे. वेगाने अमेरिकी डॉलर कोसळणार आहे. 2022 मध्ये लोक सोने. चांदी आणि बिटक़ॉईनलाच संपत्ती समजू लागणार आहेत. यामध्ये लोक जास्त पैसा गुंतवू लागतील आणि हेच कारण पृथ्वीला उद्ध्वस्त करणार आहे. आज अमेरिकेच महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. युद्धामुळे आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धAstrologyफलज्योतिषAmericaअमेरिकाrussiaरशिया