शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मुलींना शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे जगाचे 15 ते 30 ट्रिलियन डॉलरचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 6:20 PM

संयुक्त राष्ट्र मुलींच्या शिक्षणासाठी मलाला दिन साजरा करतो. या दिवसाच्या पूर्वसंध्येला जागतिक बँकेने मिस्ड अपॉर्च्युनिटिज- द हाय कॉस्ट ऑफ नॉट एज्युकेटिंग गर्ल्स हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

न्यू यॉर्क- मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे 15 ते ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे नुकसान होत आहे असे मत जागतिक बँकेतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमधील दोन तृतियांशापेक्षा कमी मुली प्राथमिक शिक्षण घेतात त्याचप्रमाणे प्रत्येक तीन मुलींपैकी  फक्त एका मुलीस निम्न माध्यमिक वर्गापर्यंत शिक्षण घेता येते.संयुक्त राष्ट्र मुलींच्या शिक्षणासाठी मलाला दिन साजरा करतो. या दिवसाच्या पूर्वसंध्येला जागतिक बँकेने मिस्ड अपॉर्च्युनिटिज- द हाय कॉस्ट ऑफ नॉट एज्युकेटिंग गर्ल्स हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरात महिलांना शिक्षण न दिल्यामुळे 15 ते 30 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे असे त्या अहवालात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण मिळालेल्या महिलांचा काम करणाऱ्या लोकांमध्ये समावेश असतो. अशिक्षित महिलांपेक्षा ते दुपटीने कमवू शकतात. जेव्हा 130 दशलक्ष मुली शिक्षणापासून वंचित राहातात, त्या इंजिनियर, पत्रकार किंवा सीइओ होण्यापासून रोखल्या जातात तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते आणि सार्वजनिक आरोग्य, स्थैर्य यांची हानी होते.असे मलाला निधीची सहसंस्थापिका मलाला युसुफजाईने म्हटले होते. 12 जुलै 2013 रोजी मलाला युसुफजाईने तिच्या 16 व्या वाढदिवशी संयुक्त राष्ट्रात भाषण केले होते. हा दिवस आता मलाला दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक बँकेच्या अहवालानुसार 6 ते 17 वयातील 132 दशलक्ष मुली शाळेत जात नाहीत. जागतिक प्रगतीच्या मार्गात अशा प्रकारची असामनता ठेवणे योग्य नाही असे जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्तलिना जिओर्जिएवा यांनी सांगितले.

टॅग्स :Womenमहिलाeducationशैक्षणिकWorld Bankवर्ल्ड बँक