अटलांटा - हिंदू आडनाव वाटत नसल्याने एका गरबा कार्यक्रमातून तरुणांना हाकलण्यात आल्याची धक्कादायक घटनी समोर आली आहे. अमेरिकेतील अटलांटा शहरातील श्री शक्ती मंदिरात गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. गुजरातच्या बडोद्यामधून अमेरिकेत शिफ्ट झालेल्या डॉ. करण जानीने हा आरोप केला आहे.
गेल्या सहा वर्षापासून अटलांटाच्या या मंदिरात नवरात्री दरम्यान गरब्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. तेव्हा कधीच कोणतीच अडचण आली नसल्याचं करणने म्हटलं आहे. मात्र यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली असता त्याची व त्याच्या मित्रांची मंदिराच्या काही कार्यकर्त्यांनी अडवणूक केली. करण आणि त्याच्या मित्रांची आडनाव ही हिंदू वाटत नसल्याने त्यांना गरब्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला. तुम्ही हिंदू दिसत नाही तुमची आडनाव हिंदू वाटत नाहीत म्हणून प्रवेश देऊ शकत नसल्याचं तरुणांना सांगितलं. या संपूर्ण प्रकारानंतर करणने श्री शक्ती मंदिराला पत्रही लिहिलं होतं. तसेच सोशल मीडियावरही भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर चेअरमनने करणची माफी मागितली.आम्ही धर्मावरून भेदभाव करत नाही असंही स्पष्ट केलं आहे.