शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

केवळ मेहूल चोकसी नव्हे; तर 28 भारतीयांनी घेतले अँटिग्वाचे नागरिकत्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 12:00 PM

अँटिग्वाने आपल्या देशात गुंतवणूक वाढावी यासाठी सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अशी योजना सुरु केली आहे. अँटिग्वाला मदत करा, गुंतवणूक करा आणि दुहेरी नागरिकत्व मिळवा अशी ती योजना आहे.

नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसी कॅरेबियन बेटांमधील एखाद्या लहानशा देशांमध्ये आश्रय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात आता अँटिग्वामध्ये भारताच्या 28 लोकांनी नागरिकत्व मिळवले असण्याची शक्यता नव्या माहितीमधून उघड होत आहे. 2014 पासून काही भारतीयांना अँटिग्वाने नागरिकत्व दिले असा आरोप होत असून आता विरोधकांनी अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धरला आहे.केवळ 2 लाख डॉलर भरणाऱ्या यापैकी 7 नागरिकांना 1 जानेवारी 2017 ते 30 जून 2017 या काळात नागरिकत्व मिळाले आहे. अँटिग्वाने आपल्या देशात गुंतवणूक वाढावी यासाठी सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अशी योजना सुरु केली आहे. अँटिग्वाला मदत करा, गुंतवणूक करा आणि दुहेरी नागरिकत्व मिळवा अशी ती योजना आहे. एकूण 1121 परदेशी लोकांनी येथील नागरिकत्व मिळवले असून त्यामध्ये 2.5 टक्के भारतीय आहेत. या सर्व लोकांमध्ये चीनी नागरिकांची सर्वात जास्त संख्या आहे. 2014 पासून कॅरेबियन देशांमध्ये 478 चीनी नागरिकांनी नागरिकत्व घेतले आहे. तसेच त्यात 42 बांगलादेशी व 25 पाकिस्तानी लोकांचा समावेश आहे.अँटिग्वा आणि बार्बाडोस नागरिकत्वासाठी गंतवणूक योजना 2012 साली जाहीर झाली. यानुसार ज्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व आहे ते काही रक्कम रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवू शकतात किंवा निधी देऊ शकतात. त्यासाठी  पर्याय देण्यात आले आहेत. अँटिग्वा विकास निधीला 2 लाख डॉलर्स देणे, तेथील रिअल इस्टेटमध्ये 4 लाख डॉलर्स गुंतवणे किंवा तेथील व्यवसायात 15 लाख डॉलर्स गुंतवणे असे कोणेही पर्याय वापरता येऊ शकतात. मेहुल चोक्सीच्या आर्थिक ताकदीच्या मानाने हे सर्व आकडे किरकोळ म्हणावे लागतील. या पासपोर्टबरोबर 132 देशांमध्ये व्हीसाविना प्रवास करण्याची सुविधाही त्याला मिळणार आहे. असे असले तरी अँटिग्वाच्या नागरिकत्वासंबंधी संकेतस्तळावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना नागरिकत्व मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. मात्र आजवर अनेक घोटाळेबाजांनी अशा प्रकारचे मार्ग वापरुन लहान देशांमध्ये नागरिकत्व मिळवून चैनीत जगण्याचा मार्ग अवलबंला आहे. पीएनबी घोटाळ्यात बँकेची व पर्यायाने भारत देशाची फसवणूक करणाऱ्या मेहुलला अँटिग्वासारखे देश स्वर्गच आहेत.

सेंट किट्स आणि नेवीसचा पायपोर्टही सहज मिळू शकतो. 1.3 कोटी रुपये दिले की या देशाचा पासपोर्ट केवळ चार महिन्यांमध्ये हातात पडतो. हे पैसे सेंट किट्स शाश्वत विकास निधीमध्ये द्यायचे किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवायचे की पासपोर्ट मिळतो. तसेच यामुळे जगभरातील 141 देशांमध्ये व्हीसाविना जाताही येतं. यामध्ये भारत आणि इंग्लंड देशांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर डॉमिनिका रिपब्लिकमध्ये 68 लाख रुपयांचा निधी दिला की तुम्ही प्रत्यक्षात तेथे न जाता पासपोर्ट मिळतो. त्याबरोबर तुम्हाला जगातील 115 देशांमध्ये व्हीसाविना फिरता येऊ शकतं. त्यामध्ये युरोपियन युनीयमधील देश, हाँगकाँग, सिंगापूर, स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाIndiaभारतbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र