पॅरिस- फ्रान्समधील सर्वात जुनं आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोट्र-डाम कॅथेड्रल या चर्चमध्ये आग लागली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी चर्चची पूर्ण इमारत सापडली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या चर्चचं नूतनीकरण सुरू होतं. त्यामुळेच ही आग लागली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही चर्चची इमारत 850 वर्षं जुनी आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीमुळे चर्चचं छत पूर्णतः कोसळलं आहे. गेल्या वर्षी हेच चर्च वाचवण्यासाठी लोकांना आर्थिक मदतीचं आवाहनही करण्यात आलं होतं. चर्चची इमारत फारच जुनी असल्याकारणानं मोडकळीस आली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते म्हणाले, सर्वच ख्रिश्चन लोकांबरोबर आमच्या संवेदना जोडलेल्या आहेत. या दुर्घटनेमुळे मला अतीव दुःख झालं आहे. मी पूर्ण देशवासीयांच्या वतीनं आज दुःखी आहे. मला हे चित्र पाहून फारच त्रास होतोय. आपला एक भाग आगीच्या विळख्यात सापडला आहे.
फ्रान्समध्ये 800 वर्षं जुना प्रसिद्ध चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 1:21 AM