शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

आता आकाशात दिसणार ‘मलाला’ नामक लघुग्रह

By admin | Published: April 13, 2015 4:16 AM

मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या आणि नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचे नाव आता एका लघुग्रहाला देण्यात आले आहे. अमेरिकी

वॉशिंग्टन : मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या आणि नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचे नाव आता एका लघुग्रहाला देण्यात आले आहे. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाच्या नामकरणानंतर आता आकाशात मलाला नामक लघुग्रह पाहायला मिळणार आहे. चार किलोमीटरचा व्यास असलेला हा लघुग्रह या नामकरणापूर्वी ‘३१६२०१’ नावाने ओळखला जात असे. मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या पट्टात हा लघुग्रह आहे. सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यास यास साडेपाच वर्षांचा काळ लागतो. २०१० मध्ये नासाचे संशोधक एमी मेन्झर यांनी या लघुग्रहाचा शोध लावला होता. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या नियमानुसार मेन्झर यांना लघुग्रहास नाव देण्याचा अधिकार आहे. तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे मेन्झर यांनी सांगितले. मानवतेसमोरील गुंतागुंतीच्या समस्यांची उकल करण्यासाठी सर्व प्रज्ञावंतांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. आम्ही अर्ध्या लोकसंख्येला त्यांचे हक्क नाकारू शकत नाही, असे मेन्झर म्हणाले.मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालावर आॅक्टोबर २०१२ मध्ये पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात दहशतवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. यातून ती बालंबाल बचावली. (वृत्तसंस्था)