न्यूयॉर्क : १९६१ मध्ये मानव पहिल्यांदा अंतराळात गेला. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की मुले अंतराळात जन्माला येतात का? जगभरातील शास्त्रज्ञ ६२ वर्षांनंतरही हे गूढ उकलू शकलेले नाहीत. मात्र, ब्रिटन आणि नेदरलँडचे शास्त्रज्ञ लवकरच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार आहेत.
एका अहवालानुसार, ब्रिटिश शास्त्रज्ञ स्पेसबॉर्न युनायटेडच्या सहकार्याने असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी इन स्पेस मॉड्यूल बनवत आहेत. या अंतर्गत अंतराळात जैव उपग्रह पाठवण्यात येणार आहे. याच्या आत,इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) उपचाराद्वारे गर्भाचा जन्म होईल. त्यानंतर त्याला पृथ्वीवर आणून स्त्रीच्या गर्भात सोडले जाईल. पृथ्वीवर जन्माला आलेल्या या मुलांना ‘स्पेस बेबीज’ म्हटले जाईल.
कशी असेल प्रक्रिया?७५ सेंमीच्या एका डिस्कमध्ये संशोधक आयव्हीएफ उपचाराचे यंत्र ठेवतील. - डिस्कला पृथ्वीपासून २३० किमी वर पाठवले जाईल. येथे किरणोत्सर्ग मर्यादित असतो.- आयव्हीएफ यंत्र स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी तयार करेल. त्याच्या नियंत्रित तापमानात शुक्राणू आणि अंडी फर्टिलाइज होईल.- भ्रूण तयार झाल्यानंतर ५ दिवसांनी त्याला फ्रिज करून पृथ्वीवर आणण्यात येईल.
निवड कशी होणार?गरोदर स्त्रिया आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली जाईल. ज्या महिलांवर हा प्रयोग केला जाईल त्यांना किमान दोन यशस्वी प्रसूतीचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यांच्या शरीरात उच्च किरणोत्सर्ग सहन करण्याची ताकद देखील असली पाहिजे.
स्पेसबॉर्नचे संस्थापक डॉ. एगबर्ट एडेलब्रोक म्हणाले की, या प्रकल्पाचा अंतिम उद्देश पृथ्वीच्या बाहेर नैसर्गिकरीत्या मुले निर्माण करणे हा आहे. मात्र, त्याआधी तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे. यानंतरच अंतराळात सेक्स, गर्भधारणा आणि प्रसूतीवर लक्ष केंद्रित केले जाईल.
पहिला प्रयोग उंदरांवर- या प्रकल्पासाठी पहिला प्रयोग उंदरांवर केला जाणार आहे. त्यांचे शुक्राणू आणि अंडी अंतराळात फलित होतील. मॉड्यूलच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणारे पहिले उड्डाण एप्रिलमध्ये कॅनडातून उड्डाण करेल. - संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आयव्हीएफ असलेला एक पूर्ण-कार्यक्षम जैव-उपग्रह १८ ते २४ महिन्यांत तयार होईल. उंदरांवर प्रयोग झाल्यानंतर लवकरच मनुष्यावर ही त्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.