इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे, आता इस्त्रायल काय करणार? इराणच्या हल्ल्याला तो कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार? यातच आता, इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोठे संकेत दिले आहेत. इस्त्रायल इराणच्या कृत्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बदल्याचा प्लॅनही तयार केला आहे. इराणच्या कण्यावरच घाव घालण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्या स्ट्रॅटेजिक ठिकाणांना निशाना बनवले जाईल. ज्या तेलाच्या बळावर इराणच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण मादार आहे, तीच नष्ट करण्याची योजना आहे. यामुळे इराण अन्न-धान्यासाठीही असहाय्य होऊ शकतो.
इस्त्रायली अधिकारी एक्सिओससोबत बोलताना म्हणाले, "आम्ही पूर्णपणे तयार आहोत. सरकारकडून आदेश मिळताच क्षणात हल्ला केला जाईल. सर्वप्रथम इराणच्या ऑइल फॅसिलिटीला लक्ष्य केले जाईल. तेल विहिरी आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ला केला जाईल. हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली जाईल. त्यांच्या सैन्याला ज्या ठिकाणाहून शस्त्रे मिळतात ती ठिकाणेही नष्ट केली जातील. काही बड्या नेत्यांनाही टार्गेट केले जाईल. इराण अनेक वर्षांपासून अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्न करत आहे. तेही नष्ट करण्याचा प्लॅन इस्रायल आखत आहे. महत्वाचे म्हणजे इस्रायलने यापूर्वीही इराणचे अनेक सायंटिस्ट मारले आहेत.
केवळ आदेशाची प्रतीक्षा -सरकारकडून आदेश मिळाल्यास आम्ही त्यांच्या अणु केंद्रांवर हल्ला करू, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, असा हल्ला होईल, ज्याची इराणने कधी कल्पनाही केली नसेल. लढाऊ विमाने इराणमध्ये शिरून बॉम्बिंग करतील. इस्रायलने एप्रिलमहिन्यात इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला होता. तेव्हा इस्रायलने कोणतीही मोठी कारवाई केली नाही. मात्र आता जो हल्ला होईल तो अत्यंत भयावह असेल, असा दावाही इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे.