जेरुसलेम- आकाराने अत्यंत लहान असूनही जगभरातील विविध देशांना तंत्रज्ञान पुरवणाऱ्या, संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करणाऱ्या इस्रायलने आता अंतराळात नवी झेप घेण्याचे निश्चित केले आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये चांद्रमोहीम सुरु करत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.या मोहिमेत इस्रायल एक मानवरहित यान चंद्रावर पाठवणार असून त्याचे वजन 585 किलो असेल. हे यान 13 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रावर पोहोचेल असे इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:45 PM