शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

इसिसचा आता अफगाण प्रवेश तालिबानींना सुरुंग

By admin | Published: July 01, 2015 2:27 AM

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया अर्थात इसिसने अफगाणिस्तानातील काही प्रदेशावर प्रथमच ताबा मिळविला आहे. तालिबान्यांचा पराभव करीत ही कुरघोडी करणाऱ्या इसिसच्या प्रवेशामुळे तालिबान्यांच्या

सुुर्ख देवल : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया अर्थात इसिसने अफगाणिस्तानातील काही प्रदेशावर प्रथमच ताबा मिळविला आहे. तालिबान्यांचा पराभव करीत ही कुरघोडी करणाऱ्या इसिसच्या प्रवेशामुळे तालिबान्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. नानगऱ्हा प्रांतातून सुरक्षिततेच्या कारणास्तव पलायन केलेल्या नागरिकांनी सांगितले, की तालिबानविरुद्धच्या मोहिमेत इसिसचे शेकडो दहशतवादी सामील झाले होते. या भागातील अफूच्या शेतीला आग लावून देत इसिसने तालिबानच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या दिशेने कूच केले. अफूच्या शेतीतून मिळणाऱ्या पैशांच्या माध्यमातून तालिबान अफगाण सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशील असते. या प्रांताच्या मोठ्या भूभागावर इसिसने ताबा मिळविला आहे.इसिसचे सदस्य मोठमोठ्या ट्रकमधून येथे आले. त्यांनी स्वयंचलित बंदुकीने तालिबान्यांवर बेछूट गोळीबार केला. याचा तालिबान्यांनी प्रतिकार न करता पलायन केले, अशी माहिती स्थानिक आदिवासी नेत्याने दिली.