फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नेतन्याहू यांच्यात सध्या शब्दिक द्वंद्व सुरू आहे. यातच आता इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमधील फ्रेन्च मल्टीनॅशनल कंपीनी टोटलएनर्जीज गॅस स्टेशनला निशाना बनवले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, बेरूतच्या दक्षिण उपनगरात असलेल्या टोटल एनर्जीजवर इस्रायलने हवाई हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर आग लागली. मात्र, या हल्ल्यात कसल्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही.
नेतन्याहू-मॅक्रॉन वाद - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले "सर्व सभ्य देशांनी" इस्रायलसोबत संपूर्ण शक्तीनिशी उभे रहायला हवे. कारण आपण इराणच्या नेतृत्वाखालील "राक्षसी शक्तींसोबत लढत आहोत." याच वेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे इस्रायलवर शस्त्रास्त्रबंदी लादण्याचे आवान "लजास्पद" असल्याचेही म्हटले आहे.
शनिवारी एक व्हिडिओ संदेश जारी करत पंतप्रधान नेतन्याहू यांनी हे लज्जास्पद असल्याचे म्हणत, "दहशतवाद्यांच्या टोळ्या एकत्रितपणे उभ्या आहेत. मात्र जे देश कथितपणे या दहशतवादी टोळ्यांचा विरोध करत आहेत, त्याच इस्रायलवर शस्त्रास्त्र बंदीचे आवाहन करत आहेत," असे म्हटले आहे. नेतन्याहू यांच्या या विधानानंतर, मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने तातडीने एक निवेदन जारी करत, "फ्रान्स इस्रायलचा पक्का मित्र आहे आणि तो इस्राइलच्या सुरक्षिततेचे समर्थन करतो. तसेच, इराण अथवा त्याच्या समर्थकांनी इस्रायलवर हल्ला केला, तर फ्रान्स नेहमीच इस्रायलसोबत उभा असेल," असे स्पष्ट केले आहे.
त्यांना लाज वाटायला हवी - नेतन्याहू नेतन्याहू म्हणाले, "जेव्हा इस्रायल इराणच्या नेतृत्वाखालील राक्षसी शक्तींचा सामना करत आहे, तेव्हा सर्व सभ्य अथवा सुसंस्कृत देशांनी इस्रायलसोबत उभे राहायला हवे. मात्र, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि अन्य पाश्चिमात्य नेते आता इस्रायलवर शस्त्र बंदी लादण्याचे आवाहन करत आहेत. त्यांना लाज वाटायला हवी. इराण हिज्बुल्लाह, हुती, हमास आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर शस्त्रबंदी लादत आहे का? तर अजिबात नाही. दहशतवादी टोळ्या एकजुटीने उभ्या आहेत. मात्र, जे देश कथितपणे या दहशतवादी राष्ट्रांचा विरोध करतात, ते आता इस्रायलवर शस्त्रबंदी लादण्याची मागणी करत आहेत. हे अत्यंत लज्जास्पद आहे", असा संताप नेतन्याहू यांनी मॅक्रॉन यांच्या आवाहनानंतर व्यक्त केला आहे.