शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आता रशियाचीही पाकला साथ

By admin | Published: July 06, 2015 11:23 PM

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मित्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने प्रथमच पाकिस्तानच्या बाजूने कौल दिला आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मित्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने प्रथमच पाकिस्तानच्या बाजूने कौल दिला असून, चीनसारख्या देशाच्या पावलावर पाऊल टाकत घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय नेते चक्रावले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात मांडलेल्या निंदा ठरावाला समर्थन देण्यास रशियाने नकार दिला आहे. रशियाचा हा निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे परराष्ट्र धोरण यांना चांगलाच झटका असल्याचे मानले जात आहे. याआधी चीननेही असाच निर्णय घेत भारताला तोंडघशी पाडले होते. दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीसंदर्भात आॅस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे अलीकडेच एक परिषद आयोजित केली होती. त्या बैठकीत भारताने दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडली. पाकिस्तानविरोधात भारताने निंदाव्यंजक ठराव मांडला. या ठरावाच्या बाजूने मत देण्यास आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी नकार दिला; पण रशिया या सार्वकालिक भारताच्या मित्रानेही नकार दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)रशियाने पाकला समर्थन देण्याची भूमिका का घेतली असावी यासंदर्भात आता वेगवेगळी गणिते मांडली जात असून, त्यातील एका विश्लेषणानुसार रशियाला अफगाणिस्तानमधील ड्रग व्यवसाय व अफगाण-पाक सीमेवरील दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पाकची साथ हवी आहे, त्यामुळे आता पाकला दुखवून चालणार नाही या हिशोबान रशियाने पाकच्या विरोधातील ठरावास समर्थन देण्यास नकार दिला आहे.