शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भूकंपबळींची संख्या ३००

By admin | Published: October 27, 2015 11:37 PM

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सोमवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येने मंगळवारी ३०० चा टप्पा ओलांडला तर १९०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

पेशावर : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सोमवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येने मंगळवारी ३०० चा टप्पा ओलांडला तर १९०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्खॉ प्रांत आणि अन्य ठिकाणी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५० झाली. ७.५ रिश्चर स्केल क्षमतेच्या या भूकंपात १६०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानात ९० पेक्षा जास्त जण मरण पावले तर ३०० पेक्षा जास्त जखमी झाले. मरण पावलेल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे.गेल्या दहा वर्षांत एवढ्या तीव्रतेचा भूकंप प्रथमच झाला, असे जिओ न्यूजने म्हटले. खैबर पख्तुनख्वॉ (केपी) प्रांत आणि फेडरली अ‍ॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाजमध्ये (फाटा) २२८, पंजाबमध्ये ५ व पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ जण मरण पावले. खैबर पख्तुनख्वॉ प्रांतातील जखमींमध्ये मुलांचाही समावेश असून त्यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भूकंपग्रस्तांना नेमकी कोणती मदत हवी आहे व मदतीसाठीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सात पथके स्थापन करण्यात आली आहेत. पंतप्रधान नवाज शरीफ अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतले. त्यांनी मंगळवारी बैठक बोलावून मदत कार्याचा आढावा घेतला. शरीफ यांनी दुपारी शांगला भागात भूकंपग्रस्तांची भेट घेतली.लष्कराने दिलेल्या माहितीनुसार लष्करीदृष्ट्या महत्वाच्या काराकोरम महामार्गावर दरडी कोसळण्याचे ४५ प्रकार घडले. त्यातील २७ दरडी दूर करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशभर लष्करी रुग्णालयांची एकूण क्षमता ३० टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.भूकंपाचा पहिला झटका हा दुपारी २.०९ वाजता बसला व त्यानंतर सात झटके बसले. त्यात सगळ््यात शक्तिशाली झटका हा ४.८ तीव्रतेचा होता, असे अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने सांगितले. हजारो लोकांनी सोमवारची रात्र गारठवून टाकणाऱ्या थंडीत उघड्यावर काढली. भूकंपानंतर बसणाऱ्या धक्क्यांचा धसका घेऊन लोक घरी परतायला तयार नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)