शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बांगलादेशात हिंदूंच्या संख्येत १ टक्का वाढ

By admin | Published: June 24, 2016 12:31 AM

बांगलादेशातील हिंदूंच्या लोकसंख्येत वर्षभरात एक टक्क्याची वाढ झाल्यामुळे त्यांची लोकसंख्या १.७० कोटीवर पोहोचली आहे. १९५१ नंतर देशातील हिंदूंची लोकसंख्या सतत घसरत गेली होती.

ढाका : बांगलादेशातील हिंदूंच्या लोकसंख्येत वर्षभरात एक टक्क्याची वाढ झाल्यामुळे त्यांची लोकसंख्या १.७० कोटीवर पोहोचली आहे. १९५१ नंतर देशातील हिंदूंची लोकसंख्या सतत घसरत गेली होती. २०१५ मध्ये प्रथमच हे चित्र बदलले असून, या मुस्लिमबहुल देशाच्या एकूण लोकसंख्येत हिंदू आता १०.७ टक्क्यांचे वाटेकरी झाले आहेत. बांगलादेश सांख्यिकी विभागाने (बीबीएस) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या नमुना सांख्यिकी अहवालानुसार, डिसेंबर २०१५ पर्यंत देशाची लोकसंख्या १५.८९ कोटींवर पोहोचली असून, त्यात १ कोटी ७० लाख हिंदूंचा समावेश आहे. बीबीएसच्या यापूर्वीच्या अहवालानुसार २०१४ मध्ये बांगलादेशातील हिंदूंची संख्या १.५५ कोटी होती. वर्षभरात तीत १५ लाखांची वाढ झाली आहे. धार्मिक आधारावर हिंदू बांगलादेशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हिंदू समाजाचे नेते समाजाच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करीत असतानाच सांख्यिकी विभागाचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. १९५१ मध्ये देशातील हिंदूंची लोकसंख्या २२ टक्के होती. मात्र, १९७४ मध्ये ती १४ टक्क्यांवर घसरली. यानंतरही घसरण सुरूच राहिली होती. (वृत्तसंस्था)