शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

वुहानमधील बळींच्या संख्येत १२९० ने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:43 PM

चीनमध्ये एकुण बळी ४६००वर; ट्रम्प यांच्या आरोपानंतर उचलले पाऊल

बिजिंग : कोरोना साथीचे उगमस्थान असलेल्या चीनमधील वुहान शहरातल्या बळींच्या संख्येत सुधारणा करण्यात आली असून तो आकडा १,२९०नेवाढला आहे. त्यामुळे वुहानमधील एकुण बळींचा आकडाही ३,८६९ वर पोहोचला आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाच्या एकुण बळींची संख्या ४६००पेक्षा अधिक झाली आहे.

चीनमधील कोरोनाचे नवे रुग्ण व बळींची नोंदणी करण्यात स्थानिक प्रशासनाकडून काही चुका झाल्या. काही वेळा उशीरा नोंदणी झाली किंवा नोंदणी करण्याचे राहून गेले होते. आता ही सर्व आकडेवारी तपासून त्यात सुधारणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची खरी संख्या चीन जगापासून दडवून ठेवत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच केला होता. जगभरात उच्छाद मांडणारा कोरोनाचा विषाणू चीनमधील एखाद्या प्रयोगशाळेतील होता का याचीही त्या देशाने चौकशी करावी, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली होती. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या साथीमागचे रहस्य त्या देशाने सर्व जगाला सांगितले पाहिजे अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले होते. त्यानंतर जागे झालेल्या चीनने कोरोना बळींच्या आकडेवारीत सुधारणा करण्याचे पाऊल उचलले आहे. चीनच्या सीसीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, वुहान शहरातील बळींची संख्या वाढल्यामुळे देशभरातील एकुण बळींची संख्या आता ४,६००पेक्षा अधिक झाली आहे. वुहानमधील कोरोना रुग्णांच्या संख्येतही सुधारणा झाली असून तो आकडा ३२५ने वाढला आहे. (वृत्तसंस्था)अमेरिकेवर कुरघोडी करण्याचा चीनचा प्रयत्नकोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात अमेरिकेपेक्षा अधिक यश आपल्याला आले आहे असे दाखविण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे असा आरोप अमेरिकी प्रसारमाध्यमांनीही केला होता. चीन कोरोना बळी व रुग्णांची खरी आकडेवारी जगापासून लपवत आहे या अमेरिकेने केलेल्या आरोपाला वुहान शहरातील बळींच्या संख्येत झालेल्या सुधारणेने पुष्टीच मिळाली आहे असा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या