शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

नर्सचा विक्षिप्तपणा; 20 रुग्णांना स्लो पॉयजन देऊन संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:32 PM

दोन शवविच्छेदन अहवालांमुळे नर्सचं भांड फुटलं

टोकियो: जपानमध्ये एका नर्सनं विषारी औषध देऊन 20 वयोवृद्ध रुग्णांची हत्या केली आहे. आपल्या कामाच्या वेळेत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये, त्यामुळे आपल्याला कोणतंही स्पष्टीकरण द्यावं लागू नये, यासाठी नर्सनं 20 जणांना इंजेक्शनमधून विषारी रसायनं दिल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. जपानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, योकोहामाच्या ओगुची रुग्णालयात जुलै ते सप्टेंबर 2016 या कालावधीत 48 रुग्णांचा मृत्यू झाला. सप्टेंबर 2016 मध्ये रुग्णालयात मृत पावलेल्या सोजो निशिकावा (88) आणि नोबुओ यामकी (88) यांच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब आढळून आली. या दोघांच्याही शरीरात विषारी रसायन आढळून आलं. यानंतर पोलिसांनी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असलेल्या अयूमी कुबोकीला (31) ताब्यात घेतलं. तिनं दोघांच्याही हत्येची कबुली दिली. आपल्या कामाच्या वेळेत रुग्ण दगावू नये, यासाठी अयूमीनं इंजेक्शनमधून त्यांच्या शरीरात विषारी रसायन सोडलं होतं. यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. आपण आतापर्यंत 20 जणांना अशाप्रकारे मारल्याची माहितीदेखील तिनं पोलिसांना दिली.आपल्या शिफ्टमध्ये एखादा रुग्ण दगावल्यास संपूर्ण परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल, या विचारानं अयूमी कुबोकी रुग्णांना बेंजलकोनियम क्लोराइड नावाचं रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णांना द्यायची. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू एका ठराविक वेळेनंतर व्हायचा. रुग्णांच्या कुटुंबीयांचा सामना करावा लागू नये, रुग्णालय प्रशासनाला उत्तर द्यावं लागू नये, यासाठी अयूमी हे सर्व करत होती. दोन रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालांमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आणि ती पकडली गेली.  

टॅग्स :Japanजपानhospitalहॉस्पिटलInternationalआंतरराष्ट्रीय