ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 5- अमेरिकन आर्मीच्या 28 वर्षीय कॅप्टननं बराक ओबामांविरोधात खटला दाखल केला आहे. आर्मी कॅप्टन स्मिथ यांच्या मते, बराक ओबामांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाविरोधात पुकारलेलं युद्ध बेकायदेशीर आहे. त्याला अमेरिकेन काँग्रेसची परवानगी नाही.
न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आर्मीचे कॅप्टन नथन मिशेल स्मिथ यांनी इसिसविरोधात पुकारलेलं युद्ध कायद्याला धरून नसल्याचं म्हटलं आहे. या मिशनमध्ये अमेरिकन काँग्रेसकडून बराक ओबामांना अधिकार मिळाले नाहीत. तरीही आम्ही इसिसविरोधात जोरदार युद्ध करत आहोत. राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसकडून युद्ध अधिकाराच्या ठरावानुसार योग्य त्या परवानग्या घ्याव्यात आणि मग इराक आणि सीरियात इसिससोबत युद्ध पुकारावे, अशी माहिती स्मिथ यांनी कोलंबियातल्या सेशन्स कोर्टात दिली आहे.
2012मध्ये अमेरिकन आर्मीकडून त्यांना अफगाणिस्तानही आठ महिने तैनात करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी कुवेतमध्ये इंटेलिजन्स ऑफिसरसह टास्क फोर्सनं राबवलेल्या ऑपरेशनमुळेच इसिसविरोधात आंदोलन करण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. बराक ओबामांनी इसिसला स्वतःचा शत्रू मानून हे युद्ध पुकारलं आहे. भौगोलिक आणि ऐहिक परिस्थितीचा विचार न करता हे युद्ध पुकारल्याचा युक्तिवाद स्मिथ यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
मात्र दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा युद्धासंबंधी अमेरिकन काँग्रेसकडून सर्व परवानगी घेतल्याचं म्हणाले आहेत. अमेरिकेवर 9/11चा दहशतवादी हल्लानंतरच इसिसविरोधात आम्ही मोहीम उघडली आहे, अशी माहिती बराक ओबामांनी दिली आहे. स्मिथचे वकील डेव्हिड रेमस यांनी इसिसविरोधात युद्ध पुकारून बंदी प्रत्यक्षीकरण कायद्याची उल्लंघन केल्याची माहिती कोर्टाला दिली आहे.