वॉशिंग्टन : न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी गियुलियानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राष्ट्रप्रेमावर साशंकता व्यक्त केली आहे. ओबामांचे अमेरिकेवर प्रेम नाही, असे विधान करून गियुलियानी यांनी नवा राजकीय वाद निर्माण केला.आहे. तथापि, रुडी गियुलियानी यांचे हे विधान ‘भयानक’ असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.निधी उभारण्यासाठी मॅनहॅटनस्थित २१ क्लब येथे आयोजित रात्रीच्या मेजवानीत त्यांनी हे विधान करून खळबळ उडवून दिली. ओबामा यांचे अमेरिकेवर प्रेम आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. हे सांगणे भयानक असले तरी ओबामा यांचे तुमच्यावर प्रेम नाही. आपले पालनपोषण ज्या पद्धतीने झाले, त्या पद्धतीने ओबामांचे झालेले नाही. देशप्रेमातून माझे पालनपोषण झाले आहे, असेही रुडी गियुलियानी याप्रसंगी म्हणाले.ते एवढ्यावरच थांबले नाहीत. अध्यक्ष ओबामा यांचे पालनपोषण अशा पद्धतीने झाले आहे की, त्यात त्यांना अमेरिकेवर टीका करण्याचे धडे देण्यात आले होते. अमेरिकेवर ओबामा यांचे प्रेम नसले तरी ते देशभक्त आहेत, असे परस्परविरोधी वक्तव्य करून रुडी यांनी आणखीनच संभ्रम निर्माण केला आहे. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीतही रुडी गियुलियानी यांनी याच वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. मूळचे भारतीय असलेले अमेरिकन नागरिक आणि लुसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनीही गियुलियानी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.रुडी गियुलियाने यांचे वक्तव्य भयानक आहे. ओबामा लव्हज अमेरिका असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. सकाळपासून रुडी सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत असून वादग्रस्त वक्तव्याबद्दल ते खजील दिसत आहेत, असे व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव एरिक शुल्त्झ् यांनी सांगितले.
‘ओबामांचे नाही अमेरिकेवर प्रेम’
By admin | Published: February 21, 2015 3:50 AM