शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

विज्ञानाची कमाल! पतीच्या निधनाच्या दोन वर्षानंतर दिला त्याच्याच बाळाला जन्म

By sagar.sirsat | Published: July 27, 2017 5:34 PM

एका महिलेने पतीच्या निधनाच्या दोन वर्षानंतर त्याच्याच बाळाला जन्म दिल्याचं कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल...पण हे खरं आहे.

ठळक मुद्देपतीला गमावल्याचं दु;ख मनात होतंच पण त्यासोबतच मातृत्वाची आसही अनावर होती.  दुसऱ्या पुरुषाचा विचार मनात आणण्याचा काही प्रश्नच नव्हता.मोठी हिम्मत करून तिने पोलिसांकडे आपली एक वेगळी इच्छा व्यक्त केली. पोस्टमार्टम स्पर्म रिट्रायव्हल (पीएमएसआर) म्हणजे मृत्यूनंतर स्पर्म काढून जतन करण्याची प्रक्रिया

न्यू यॉर्क, दि. 27 -  एका महिलेने पतीच्या निधनाच्या दोन वर्षानंतर त्याच्याच बाळाला जन्म दिल्याचं कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल...पण हे खरं आहे. एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमध्ये ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. या महिलेचा पती न्यूयॉर्क शहर पोलीस दलात कार्यरत होता.

20 डिसेंबर 2014 रोजी ब्रुकलीन शहरात रात्रीची गस्त घालत असताना काही गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्या गोळीबारात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. व्हेनजियान लिऊ असं त्या पोलीस अधिका-याचं नाव. व्हेनजियान लिऊ याचा मृत्यू झालाय त्यावेळी पी क्षीआ चेन हिच्याशी त्याचं नुकतंच लग्न झालं होतं. 

ती रात्र पी क्षीआ चेन हिच्यासाठी त्या काळरात्र होती. पतीला गमावल्याचं दु;ख मनात होतंच पण त्यासोबतच मातृत्वाची आसही अनावर होती.  दुसऱ्या पुरुषाचा विचार मनात आणण्याचा काही प्रश्नच नव्हता.

मोठी हिम्मत करून तिने न्यूयॉर्क पोलिसांमधील पतीच्या सहकाऱ्यांकडे आपली एक वेगळी इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीचं वीर्य जतन करून ठेवावं अशी तिची इच्छा होती. किमान अपत्यामध्येतरी पतीचं अस्तित्व अनुभवता येईल हा विचारही त्यामागे होताच. तिची इच्छा मान्य करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तिचा पती व्हेनजियान लिऊ याचं वीर्य जतन करून ठेवण्यात आलं.  

पतीच्या निधनाच्या धक्क्यातून आपण आता सावरलो असल्याचं वाटल्यानंतरच पी क्षीआ चेन हिने जतन केलेल्या वीर्याद्वारे कृत्रिम गर्भधारणा करून घेतली, आणि अखेर ती यशस्वी ठरली. नुकताच तिने एका चिमुकलीला जन्म दिला. 

मुलीला जन्म दिल्यानंतर पी क्षीआ चेन हिचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मुलगी मोठी झाल्यानंतर तिला मी तिच्या वडिलांच्या साहसाच्या कथा सांगेल असं  पी क्षीआ चेन अभिमानाने सांगते.     

पोस्टमार्टम स्पर्म रिट्रायव्हल (पीएमएसआर) म्हणजे मृत्यूनंतर स्पर्म काढून जतन करण्याची प्रक्रिया- 

माणसाच्या मृत्यूनंतर जवळपास दिवसभर स्पर्मचे अस्तित्व टिकून असते. स्पर्म बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला फक्त पाच मिनिटांचा वेळ लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. पत्नीच्या विनंतीवरुन डॉक्टर मृत नव-याच्या शरीरातून स्पर्म्स काढून त्याचे जतन करतात. वर्षभरात हे स्पर्म्स पत्नी शरीरात सोडले जातात. ज्यामुळे ती आपल्या नव-यापासून गर्भवती राहते.