ऑनलाइन लोकमत -
बिजिंग, दि. 12 - एखाद्या ऑफिसमध्ये रुजू होण्यापुर्वी कोणत्या सुविधा मिळणार आहेत हा प्रत्येकाचा प्रश्न ? पण जर तुम्हाला तुमच्या बॉसने काम करताना ऑफिसमध्ये विश्रांतीसाठी झोपण्याची परवानगी दिली तर....विश्वास बसत नाही ना..चीनमध्ये दाय शियांग यांनी आपल्या ऑफिसमध्ये कर्मचा-यांना झोप घेता यावी यासाठी 12 बेड लावले आहेत.
दाय शियांग यांनी इंजिनिअर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना 72 तास काम करावं लागायचं. झोप आल्यानंतर दाय शियांग जमिनीवरच झोपायचे. त्यानंतर टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीत त्यांनी 15 वर्ष काम केलं. त्यावेळीही कधी डेस्क तर कधी जमिनीवर थोडा वेळ झोप काढायचे. सध्या त्यांनी स्वत:ची कंपनी उभारली आहे.
जेव्हा दाय शियांग यांच्या कंपनीला पहिली बिजनेस ऑर्डर मिळाली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ऑफिसच्या शांत भागात 12 बेड्स लावून घेतले. 'तंत्रज्ञानाशी संबंधित काम करताना डोकं लावण्याची खूप गरज असते, कर्मचा-यांना नवीन गोष्टी शोधण्यासाठी वेळेचे गरज असते जेणेकरुन त्यांना नव्या कल्पना सुचतील', असं मत दाय शिंयांग यांनी व्यक्त केलं आहे. 'आमच्या ऑफिसमध्ये फक्त रात्रीच नाही तर सकाळीही झोपायला परवानगी देण्यात आल्याच', दाय शियांग यांनी सांगितलं आहे.
चीनमध्ये कार्यालयीन वेळेत झोपणं काही नवीन नाही, कारण अनेक कंपन्यांमध्ये कमी पैशांत कर्मचा-यांकडून जास्त काम करुन घेतलं जात. मात्र चीनमधील तंत्रज्ञान विभाग यापासून दूर होता. चीनमध्ये सध्या तंत्रज्ञानाला मागणी असून नव्याने लोकांची भर्ती केली जात आहे.
कंपनी प्रोगामर दर दिवसाला ओव्हरटाईम करतात त्यामुळे त्यांना जेवण्याची आणि रात्री 9 नंतर डेस्कवर झोपण्याची परवानगी आहे. इतकच नाही तर काही कंपन्यांमधील कर्मचारी आठवडाभर ऑफिसमध्येच राहतात. तिथे त्यांचा राहण्याची, झोपण्याची व्यवस्था केलेली असते.