लंडन : येमेनमधील बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी सौदी अरेबियाने हवाई हल्ले सुरू करताच कच्च्या तेलाचे भाव भडकले आहेत. या संघर्षाची आग तेलसमृद्ध मध्य-पूर्वेकडील देशांना बसण्याची भीती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या भागातून होणारा तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.सौदी आणि मित्र फौजांनी येमेनी बंडखोरांच्या अड्ड्यांवर निशाणा साधत हवाई हल्ले सुरू केल्याची खबर थडकताच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव एकदम उसळले. अमेरिकेत कच्च्या तेलाचा वायदा भाव प्रति बॅरल ५१ डॉलरवरून ५९.७१ डॉलरवर चढला. तथापि, या संघर्षाची झळ लागलीच मध्य-पूर्वेला बसणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर भाव कमी होत ५६.५० डॉलर बॅरलवर आला.आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक मार्गावरच येमेन आहे; परंतु येमेन यादवीच्या दिशेने जात आहे. या संघर्षात इराण उतरण्याची भीती मात्र कायम आहे. या लढ्यात संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार आणि कुवैत या देशांचा सौदी अरबला पाठिंबा आहे. हौथी बंडखोरांची आगेकूच रोखण्यासाठी सौदी अरबने उपरोक्त मित्र देशांच्या सहकार्याने हवाई हल्ले सुरू केले आहेत. इराण व सौदी अरब हे दोन्ही देश ओपेकचे (पेट्रोलियम निर्यातदारांची संघटना) सदस्य आहेत. जगभरात उत्पादित होणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ४० टक्के उत्पादन ओपेक सदस्य देशांत होते. युरोपला लाल सामुद्रधुनी, अॅडन व द्जिबौती बंदरातून तेल निर्यात होते.च्एडन : येमेनमधील अस्थिरतेतून यादवी युद्ध सुरू होण्याची भीती असताना, तेथील सरकारला वाचविण्यासाठी सौदी अरेबियाने आज बंडखोरांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. आखातातील १० देशांच्या आघाडीने ही कारवाई सुरू केली असून संकटात असणारे येमेनचे अध्यक्ष अद्राबूब मन्सूर हादी यांना वाचविणे हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य आहे. फर्मनेस स्टॉर्म असे नाव या लष्करी कारवाईस देण्यात आले आहे. बंडखोरांचा इशारा सौदी अरेबियाची कारवाई हे येमेनवरील आक्रमण समजले जाईल व त्यामुळे या भागात मोठे युद्ध सुरू होईल, असा इशारा हौथी बंडखोरांचा नेता मोहम्मद अल बुखैती याने सौदी अरेबियाला दिला आहे.
आखाती संघर्षाने तेलाचा भडका
By admin | Published: March 27, 2015 1:34 AM