राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना विरोध म्हणून अमेरिकेतील जनता रस्त्यावर उतरली आहे. अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. असे असतानाच डोनाल्ड ट्रम्प, आपले आर्थिक धोरण योग्य असल्याचे सांगताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी केलेल्या टेरीफच्या घोषणेनंतर, आशिया आणि युरोपातील शेअर बाजारांत मोठी घसरण बघायला मिळत आहे. यातच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले टॅरिफचे पाऊल योग्य असल्याचे म्हणत, तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, ब्याज दर कमी झाले आहेत आणि महागाईही राहिलेली नाही, असे म्हटले आहे.
शिवाय, अमेरिकन सवलतींचा सर्वात मोठा गैरवापर करणाऱ्या चीनवर आयात शुल्क लादल्यापासून चिनी बाजारात मोठी घसरण झाली आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, व्याजदर कमी झाले आहेत (मंद गतीने चालणाऱ्या फेडने दर कमी करायला हवेत!), अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या आहेत, महागाई नाही आणि बऱ्याच काळापासून पीडित असलेली अमेरिका, आता आधीपासूनच लागू असलेल्या टॅरिफचा गैरवापर करणाऱ्या देशांकडून दर आठवड्याला अब्जावधी डॉलर्स आणत आहे."
"सर्वात मोठा आक्षेपार्ह देश, चीन, ज्याची बाजारपेठ कोसळत आहे, त्याने दीर्घकालीन उच्च आयात शुल्काव्यतिरिक्त, ३४% ने आयात शुल्क वाढवले आहे आणि आक्षेपार्ह देशांनी प्रत्युत्तर न देण्याचा माझा इशारा ऐकला नाही तरीही हे घडत आहे. त्यांनी अनेक दशकांपासून अमेरिकेचा फायदा घेऊन खूप चूक केली आहे! चीन कोसळत आहे," असे ट्रम्प म्हणाले.ट्रम्प म्हणाले, "सर्वाधिक गैरवापर करणारा देश चीन, चीनचा बाजार कोसळत आहे. त्याने आपल्या टॅरिफमध्ये 34% ची वाढ केली आहे. जी त्यांच्या दीर्घकालिक उच्च टॅरिफच्याही वरची आहे. गैरवापर करणाऱ्या देशाने प्रत्युत्तरात कारवाई न करण्याचा माझा इशारा ऐकला नाही. त्यांनी अनेक दशके अमेरिकेचा फायदा उचलून मोठी चूक केली आहे. आता चीन उद्ध्वस्त होत आहे.