थायलॅंड (Thailand) हे पर्यटकांमध्ये सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. इथे जगभरातील लोक एन्जॉय करण्यासाठी येतात. येथील नाइट लाइफचीही खूप चर्चा होत असते. तसेच थायलॅंडमध्ये आले आणि मसाज पार्लरमध्ये (Massage Parlour) गेले नाही असं होत नाही. पण थायलॅंडच्या पटायामध्ये एका व्यक्तीला मसाज करणं चांगलंच महागात पडलं. मसाज करत असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्या स्थितीत त्याचा मृतदेह सापडला त्याने सगळेच हैराण झाले.
मीडिया रिपोर्टनुसार, ७० वर्षीय ही व्यक्ती ब्रिटनची होती. तो ब्रिटनमधून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पटायाला गेला होता. पण तिथे त्याने मसाज पार्लरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. असं सांगितलं जात आहे की, त्याने हॅपी एंडिंग नावाच्या मसाज पार्लरमध्ये बुकिंग केलं होतं. तिथे गेल्यावर त्याला कपडे काढून टेबलवर झोपण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर मसाज गर्लने त्याची मसाज सुरू केली. काही वेळाने त्याने तिला सरळ झोपण्यास सांगितलं तर पण त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. चेक केलं तर समजलं की, त्याचा मृत्यू झालाय.
या व्यक्तीला मसाज देणाऱ्या महिलेचं नाव मिस ओरया होतं. तिने सांगितलं की, ही घटना दुपारी साधारण ३ वाजताची आहे. ती म्हणाली की, व्यक्ती सुरूवातीला नॉर्मल होता. पण नंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तिने त्याला विचारलं की, सर तुम्ही ठीक आहात का? तर त्याने हो असं उत्तर दिलं. पण त्यानंतर त्याने हालचाल बंद केली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर महिला ओरडायला लागली. मदतीसाठी आलेल्या लोकांनी व्यक्तीला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा जीव वाचू शकला नाही.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी व्यक्तीचा मृतदेह टॉवेलने गुंडाळला आणि आपल्यासोबत घेऊन गेले. अजून या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. मसाज पार्लरने सांगितलं की, ही व्यक्ती पहिल्यांदाच त्याच्याकडे मसाज घेण्यासाठी आली होती. त्याच्याकडे कोणतं आयडी कार्डह नव्हतं. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत आहेत. जेणेकरून समजावं की, त्याचा मृत्यू कसा झाला?