सिडनी : आॅस्ट्रेलियन संशोधकांना साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वीची म्हणजेच पृथ्वीपेक्षाही जुनी समजली जाणारी उल्का कोरड्या पडलेल्या सरोवराच्या तळाशी सापडली. मावळत्या वर्षाच्या सायंकाळी उत्तर-दक्षिण आॅस्ट्रेलियाच्या कटी थांडा-एरे सरोवरात ही उल्का सापडली. ही उल्का सापडल्यानंतर काही तासांतच पाऊस झाला व त्यात तिचे सगळे माग दिसेनासे झाले. कटी थांडा सरोवरात त्यासाठी खोदकाम करावे लागले. ही उल्का पृथ्वीपेक्षाही जुनी आहे. हा असा खडक आहे, की तुम्ही कधी हातीही घेतला नसेल. ही उल्का आमच्यापर्यंत मंगळाच्या भ्रमणकक्षेच्या पलीकडून पोहोचली आहे, असे ते म्हणाले. हे सरोवर १०० वर्षांत काही मोजक्याच वेळा भरले गेले आहे. हे सरोवर जेव्हा भरते तेव्हा ते आॅस्ट्रेलियातील सर्वात मोठे सरोवर असते. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या १५० मिलिमीटर पावसामुळे या सरोवराच्या भोवतालचा भाग पाण्याने भरून गेला. ही उल्का दगडी किंवा चोन्ड्राईट असावी. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला आकाराला येण्याच्या प्रारंभीच्या काळातील साहित्य म्हणून ती उदाहरणादाखल उपलब्ध असल्याचे ब्लांद यांनी एबीसीला सांगितले. (वृत्तसंस्था)कर्टिन विद्यापीठाचे भूगर्भशास्त्रज्ञ फिल ब्लांद आणि रॉबर्ट होवी यांनी ही उल्का शोधण्यासाठी डेझर्ट फायरबॉल नेटवर्क नावाचे ३२ रिमोट कॅमेरे वापरले. या कॅमेऱ्यांमुळे शोधकाम ५०० मीटरवर मर्यादित राखता आले. उल्का शोधण्याचे काम तीन दिवस चालले व त्यासाठी ड्रोन, एरियल स्पॉटर व स्थानिक आदिवासींची मदत घेण्यात आली. या तुकडीचे काम हे अति आश्चर्यकारक म्हणण्यासारखे होते, असे ब्लांद यांनी आॅस्ट्रेलियन ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशनशी (एबीसी) बोलताना सांगितले.
पृथ्वीपेक्षाही जुनी उल्का सापडली
By admin | Published: January 08, 2016 3:25 AM