जुन्या पियानोच्या कीबोर्डखाली एवढी सोन्याची नाणी कोणी आणि का दडवून ठेवली याचा चौकशी करणारे विचार करीत आहेत. ही एकूण नाणी सहा किलोग्रॅ्रम व संख्येत ९१३ आहेत. आता ती देशाचा ठेवा असल्याचे गुरुवारी अधिकाऱ्याने जाहीर केले. श्रोपशायर परगण्यातील शाळेत हा पियानो होता व त्याचा सूर नीट लावण्यासाठी कारागिर आला होता त्यावेळी ही बाब उघडकीस आली. या नाण्यांचे मूल्य किती हे अजून निश्चित झालेले नाही. ब्रिटिश संग्रहालयाच्या तज्ज्ञांनी या नाण्यांचा काळ १८४७ ते १९१५ असा असल्याचा सांगितला. यातील ६३३ ही पूर्ण सुवर्ण नाणी आहेत तर २८० अर्ध सुवर्ण आहेत. हाताने व्यवस्थित शिवलेल्या पिशवीत ही नाणी ठेवली गेली होती. ती दडवून ठेवली गेली त्यावेळी त्यांची किमत ७७३ पौंड असावी. यातील बहुसंख्य नाणी ही क्वीन व्हिक्टोरिया यांच्या राजवटीतील असून त्यांची सुवर्ण शुद्धता ९१.७ टक्के आहे. सोन्याचे घबाड असलेला हा पियानो एका जोडप्याकडे ३३ वर्षे होता परंतु त्यांना या तिजोरीची माहितीही नव्हती.
राणीच्या काळातील सुवर्ण नाणी सापडली जुन्या पियानोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:29 AM