शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

OMG! देशाची लोकसंख्या २९ कोटींनी घटणार; जगभरातील घसरण कोणीही थांबवू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 3:39 PM

भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे.

वाढती लोकसंख्या जगासाठी आज मोठे संकट बनली आहे. परंतू, वॉशिंग्टन यूनिवर्सिटीने एक धक्कादायक अहवाल दिला आहे. भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. परंतू त्यानंतर जी लोकसंख्या घसरेल ती घसरण कोणीही कधीच थांबवू शकणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

जगाची लोकसंख्या 2100 पर्यंत कमी होत जाणार आहे. 2064 मध्ये ही लोकसंख्या 9.7 अब्ज एवढी असेल. परंतू, पुढची ३६ वर्षे अशी जातील की ही लोकसंख्या 8.79 अब्जांवर येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे. यानुसार एकट्या भारतात २९ कोटींनी लोक कमी होणार आहेत. 

सर्वाधिक टेन्शन तर चीनला आहे. चीनची लोकसंख्या आता वृद्धापकाळाकडे जाऊ लागली आहे. २१०० मध्ये चीनची लोकसंख्या जवळपास निम्म्याने कमी होईल, असा अंदाज आहे. सध्या चीनमध्ये १४० कोटी लोक राहतात. त्यामध्ये 66.8 कोटींची घट होईल आणि लोकसंख्या 74 कोटींवर येईल. लोकसंख्या घसरणीचा जो ट्रेंड सुरु होईल तो कधीही बदलता येणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

कुठे कुठे लोकसंख्या वाढणार....युरोपसह आशिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल. परंतू आफ्रिकेमध्ये लोकसंख्या वाढणार आहे, मात्र, त्याचा वेग कमी असेल. नायजेरियामध्ये 58 कोटींनी लोकसंख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

काय होता जन्मदर...लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी तज्ज्ञांनी शहरीकरण आणि महिलांच्या शिक्षणाला महत्व दिले आहे. याचबरोबर महिलांचे नोकरी करणे आणि गर्भनिरोधकांचा वापरही याला कारणीभूत आहे. १९६० मध्ये जगात एक महिला सरासरी 5.2 मुलांना जन्म देत होती. आज हा आकडा 2.4 मुले एवढा कमी झालेला आहे. 2100 पर्यंत हा सरासरी आकडा 1.66 मुले एवढाच होणार आहे.