नेदरलँड : दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) युरोपला (Europe) परतलेल्या 2 फ्लाइटमुळे संपूर्ण युरोपमध्ये कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. नेदरलँडमध्ये ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे प्रकरण समोर आल्यानंतर चिंता वाढली आहे. दरम्यान, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथून अॅमस्टरडॅमला पोहोचलेल्या दोन वेगवेगळ्या फ्लाइटमधील काही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, ज्या प्रवाशांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, तेच देशातील ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचे कारण बनू नयेत, अशी प्राधिकरणाला भीती आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी, जगातील सर्व देशांनी प्रवासी बंदीसह परदेशी प्रवाशांच्या विमानतळावर आवश्यक नियम लागू केले आहेत. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेतून अॅमस्टरडॅमला परतलेल्या जवळपास 100 प्रवाशांना कोरोना काळात आंतरराष्ट्रीय प्रवास बंदीच्या नियमांना सामोरे जावे लागले. प्रवासापूर्वी सर्व प्रवासी त्यांच्या आवश्यक कागदपत्रांसह उतरले. परंतु गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर त्यांना अनेक कोरोना नियमांचे पालन करावे लागेल, याची कल्पना नव्हती. दरम्यान, अमेरिकेसह काही देशांनी लसीकरण केलेल्या प्रवाशांसाठी कोरोना निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट देखील दाखविणे अनिवार्य केले आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या दहशतीमध्ये प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले, तोपर्यंत सर्व काही बदलले होते. दरम्यान, कोरोना व्हायरसचा हा नवीन व्हेरिएंट आल्यानंतर अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर प्रवास बंदी लादली आहे आणि तिथून येणाऱ्या प्रवाशांना कडक तपासणी आणि देखरेखीला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या या प्रवाशांनाही टेस्टसाठी अनेक तास वेटिंग रूममध्ये बसावे लागले. दक्षिण आफ्रिकेतून परत आलेल्या एखाद्या प्रवाशाला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याची भीती अधिकाऱ्यांना होती.
'प्रवाशांना आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक होते' डच प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, जवळपास 60 प्रवाशांना अॅमस्टरडॅमला घेऊन जाणाऱ्या दुसर्या फ्लाइटमध्ये, सर्व प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यापैकी 14 प्रवाशांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली होती. अधिकाऱ्यांनी या सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले आहे. तसेच, अधिकाऱ्यांकडून स्पेनला पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही प्रवाशांनाही अटक करण्यात आली आहे.
इटलीचे प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट फॅब्रिझियो प्रीग्लिआस्को यांनी सांगितले की, हे सर्व प्रवासी जगभर प्रवास करतात, कोण कुठे गेले हे माहीत नव्हते. त्यामुळे या प्रवाशांना 7 ते 10 दिवस क्वारंटाईन किंवा आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक होते आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक होते. कारण त्यांचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला तरीही फ्लाइटमध्ये प्रवास करताना त्यांना संसर्गाची लागण होऊ शकतो.