कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने जगाचा ताप वाढविला आहे. गेल्या दीड महिन्यापासून नव्या व्हेरिअंटने दहशत निर्माण केलेली असताना या व्हेरिअंटने नवीन व्हेरिअंटची उत्पत्ती केली आहे. या व्हेरिअंटची तपासणी केल्यावर ब्रिटनने जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे.
वैज्ञानिकांनी सांगितले की, सध्या या व्हेरिअंटवर संशोधनसुरु असून त्याच्यापासून असलेला धोका किती आहे याचे परीक्षण केले जात आहे. यूकेएचएसएचे संचालक डॉ. मीरा चंद यांनी सांगितले की, ओमायक्रॉन सतत म्युटेट करणारा व्हेरिअंट आहे. यामुळे भविष्यातही नवीन रुपे दिसत राहतील. ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिअंटच्या जिनोम सिक्वेंसिंगवर सतत लक्ष ठेवून आहोत.
ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलनुसार युकेच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने ब्रिटनमध्ये या नव्या व्हेरिअंटचे ५३ सिक्वेंस सापडले आहेत. यूकेएचएसएनुसार ब्रिटनमध्ये BA.2 स्ट्रेनचे ५३ रुग्ण सापडले आहेत. आरोग्य एजन्सीने हा व्हेरिअंट कमी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
यूकेएचएसएनुसार डेन्मार्कमध्ये BA.2 वेगाने वाढत आहे.२०२१ च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये याचा वाटा २० टक्के होता. २०२२ च्या दुसऱया आठवड्यात हा वाटा वाढून ४५ टक्के झाला आहे.