काबूल:अफगाणिस्तानवरतालिबानच्या ताब्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली असून, घर भागवण्यासाठी लोकांना मिळेल ते काम करावे लागत आहे. यातच आता एका प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, कुटुंबाचे पोट भागवण्यासाठी त्याला रस्त्यावर खाद्यपदार्थ विकावे लागत आहेत.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांच्या सरकारमध्ये काम केलेले कबीर हकमाली यांनी ट्विट करुन या पत्रकाराची माहिती दिली आहे. कबीर कमाली याने तीन फोटोही शेअर केले आहेत. एकामध्ये तो पत्रकार स्टुडिओमध्ये अँकरच्या पोजमध्ये बसलेला दिसत आहे. दुसऱ्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकताना दिसत आहे.
पोस्टवर अनेक कमेंट्सया पोस्टवर अनेक भारतीय लोकांनीही कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले - 'भारताकडून प्रेम आणि काळजी... आशा आहे की भारत सरकार या लोकांना मदत करेल.' दुसर्याने लिहिले - 'भारतात या, इथे अधिक संधी आहेत.' याआधी कबीरने ट्विट करून आणखी एका पत्रकाराचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी एकराम इस्मतीसोबत घडलेला प्रकार सांगितला.