ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 26 - अमेरिकेतल्या ओहायो इथल्या सिनसिनाटीमधील एका नाइटक्लबवर एकानं गोळीबार केला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये अनेक जण गंभीर आहेत, असं वृत्त एएफपीनं दिलं आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.सिनसिनाटीमधल्या पूर्वेकडच्या कॅमिओ क्लबमध्ये ही घटना घडली आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांची संख्या 1 किंवा 2 असू शकते. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती गंभीर असल्याचंही सांगितलं आहे. एका पोलिसानं सांगितलं की, 20 वर्षांच्या कार्यकाळात अशी घटना मी पाहिली नाही. मात्र या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी फार कमी आहेत. अधिका-यांच्या मते, क्लबमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त समजलं होतं. पोलिसांकडे जखमींची अधिक माहिती उपलब्ध नाही. वर्षभरापूर्वीच फ्लोरिडाच्या ओरलँडोमधील नाइटक्लबवरही अशाच प्रकारचा गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात 49 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 53 लोक जखमी होते. गोळीबार झालेल्या क्लबमध्ये एलजीबीटी समुदायातील लोक उपस्थित होते.
#BREAKING One killed, 14 wounded in Ohio nightclub shooting: US media— AFP news agency (@AFP) March 26, 2017